पुण्याहून मेहकरला चालली होती बस, अचानक कंटेनर आडवा आला अन्…

पुण्याहून मेहकरकडे एसटी चालली होती. मात्र निश्चित स्थळी पोहचण्याआधीच वाटेत घात झाला. वाटेत कंटेनर आडवा आला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

पुण्याहून मेहकरला चालली होती बस, अचानक कंटेनर आडवा आला अन्...
एसटी बस आणि कंटेनर अपघातात पाच जणांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 9:02 AM

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते मेहकर रस्त्यावर असलेल्या पळसखेड चक्का गावाजवळ एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी बस पुण्याहून मेहकरला जात होती. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, जवळपास 10 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने सिंदखेड राजा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. याप्रकरणी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अपघातात बस आणि ट्रक चालकाचा मृत्यू

अपघात एव्हढा भीषण होता की, ट्रकमधील चालक हा फसलेला असल्याने त्यांना कटरच्या सहाय्याने तोडून बाहेर काढावे लागले. अपघातामध्ये एस्टी चालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस ही वेगाने मेहकरच्या दिशेने जात होती, तर कंटेनर हा मेहकरवरून सिंदखेड राजा कडे जात होता. यावेळी दोघांची समोर समोर धडक झाली. या धडकेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामस्थांनी सिंदखेड राजा पोलीस स्टेशनला सकाळी सहा वाजल्यापासून फोन केले. मात्र तब्बल दीड तासानंतर सिंदखेड राजा पोलीस घटनास्थळी आले. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

उल्हासनगरात मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात

उल्हासनगरमध्ये मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात तीन गाड्यांचं नुकसान झालं असून, कुणालाही इजा झालेली नाही. उल्हासनगरच्या कॅम्प 1 मधील धोबी घाट परिसरात आर. के. पांडे बिल्डिंगजवळ एक मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. हा ट्रक ओव्हरलोड असल्यानं उतारावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक उलटला. या ट्रकने एक रिक्षा आणि एका टेम्पोला धडक दिल्यानं दोन्ही वाहनांचं नुकसान झालं. या अपघातात सुदैवानं कुणालाही इजा झालेली नसून, गाड्यांचं मात्र नुकसान झालं आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.