Buldhana Fake Note : नकली नोटा प्रकरणात MIM च्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक, आतापर्यंत सात आरोपींना अटक

दरम्यान शहर पोलिसांनी एएमआयएम या पक्षातून एक महिनापूर्वी पदावरून पायउतार कारण्यात आलेले माजी जिल्हाध्यक्ष शहजाद खान सलीम खान याला अटक केली आहे. यापूर्वी अटकेत असलेल्या आरोपीने शहेजाद खान याच्या नावाची कबुली दिल्याने ही अटक करण्यात आली आहे.

Buldhana Fake Note : नकली नोटा प्रकरणात MIM च्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक, आतापर्यंत सात आरोपींना अटक
नकली नोटा प्रकरणात एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 7:00 PM

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील नकली नोटा (Fake Note) प्रकरणात पोलिसांनी एएमआयएम या पक्षातून महिनाभरापूर्वी पायउतार झालेले माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शहेजाद खान याला मलकापूरातील माळीपुरा मंगलगेट परिसरातून अटक (Arrest) करण्यात आली आहे. खान याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालायने त्याला 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील महिन्यात 23 फेब्रुवारी रोजी मलकापूर शहरातील एचडीएफसी बँकेत नकली नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी ईरफान हनीफ पटनी (रा. वडनेर भोलजी) याच्यासह खामगाव, मलकापूर, नांदुरा येथून सहा आरोपींना शहर पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. (Former MIM district president arrested in fake note case, Seven accused arrested)

आरोपीला 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

दरम्यान शहर पोलिसांनी एएमआयएम या पक्षातून एक महिनापूर्वी पदावरून पायउतार कारण्यात आलेले माजी जिल्हाध्यक्ष शहजाद खान सलीम खान याला अटक केली आहे. यापूर्वी अटकेत असलेल्या आरोपीने शहेजाद खान याच्या नावाची कबुली दिल्याने ही अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नकली नोटा चलनात आणण्याच्या या गोरखधंद्यात जिल्हाभरात साखळीच असून लवकरच या साखळीचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील आणखी काहींना पोलिसांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

अकोल्यातही लाखो रुपयांच्या नकली नोटांसह तिघांना अटक

अकोला जिल्हात काही दिवसांपूर्वी नकली नोटा चलनात आणून लोकांना फसवणाऱ्या चार आरोपींविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली होती. एक आरोपी फरार असून पुढील तपास तेल्हारा पोलिस करीत आहेत. तेल्हारा पोलिस आरसुड या मार्गावर गस्त घालत असताना तालुक्यातल्या नसिंगपूर येथील शेख मुराद शेख अजीस हा आपल्या घरी जात असताना आरोपीने नकली 500 रुपयांच्या दोन नोटांची चिल्लर त्यांच्याकडे मागितली. चिल्लर दिल्यानंतर काही वेळाने शेख मुराद यांच्या लक्षात आले की सदर नोटा ह्या नकली आहेत. त्यावरून तेल्हारा पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पीएसआय गणेश कायंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठून तिथे विचारपूस केली. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून भारतीय चलनातील नगद 500 च्या 108 नोटा असे 54 हजार तसेच लहान मुलाच्या खेळणातील नकली 500 च्या 1200 नोटा असे 4 बंडल असा 23 लाख 96 हजार रुपये व एक स्कॉर्पिओ आणि क्रेटा गाडी असा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त करत तीन आरोपींना अटक करण्यात आली. (Former MIM district president arrested in fake note case, Seven accused arrested)

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याणमध्ये जागेच्या वादातून बिल्डरच्या कार्यालयात तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद

Parabhani Suicide : परभणीत रंगपंचमीच्या दिवशीच विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.