शेतकऱ्यांचे लक्ष्य उद्याच्या पावसाच्या भविष्यवाणीकडे, वाघ महाराज यांचे वंशज वर्तवणार अंदाज
वाघ महाराज पुढील वर्षभरातील पाऊस पाणी, पीक परिस्थितीसोबतच राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाकित वर्तवणार आहेत.
बुलढाणा : पाऊस पिकाचा अंदाज सांगणाऱ्या भेंडवड येथील प्रसिद्ध घट मांडणीतमध्ये आज घट मांडण्यात आले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर अठरा विविध प्रकारचे धान्याचा गोलाकार पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. याच्या मधोमध एक खड्डा करून त्यामध्ये घागर ठेवण्यात आली आहे. या घागरीवर पुरी, करंजी पापड, यासारखे विविध साहित्य ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक साहित्य विविध घटकाचे प्रतीक मानली जातात. या मांडलेल्या घटात रात्रभरातून होणाऱ्या बदलांच्या आधारे उद्या सूर्योदयाच्या वेळी हे संपूर्ण बदलाचे निरीक्षण करण्यात येईल. यावरून वाघ महाराज पुढील वर्षभरातील पाऊस पाणी, पीक परिस्थितीसोबतच राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाकित वर्तवणार आहेत.
चंद्रभान महाराज यांनी सुरू केली परंपरा
या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी ही परंपरा ३५० वर्षापूर्वी सुरू केली. ही प्रथा आजच्या काळात त्यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचे निरीक्षण करून अंदाज जाहीर करतात. यंदा किती पाऊस पडणार याची भविष्यवाणी या माध्यमातून व्यक्त केली जाते. गेल्या तीन वर्षात देशावर कोरोनासारख्या भयंकर संकटाने आक्रमण केले होते. त्यामुळे याठिकाणी राज्यभरातून शेतकरी येऊ शकले नाहीत.
साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा
३५० वर्षांपूर्वीपासून अक्षय तृतीयेला ही प्रथा जोपासली जाते. असा दावा बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी करतात. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमंध्ये मोठी उत्सुकता असते.
राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो. अशी ही घट मांडणी येत्या शनिवारी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावी होणार आहे.
शेतकऱ्यांचा मोठा विश्वास
मात्र आता येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची, पिकांची, देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे? हे या अंदाजानुसार जाणून घेण्यासाठी या वर्षी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हे अंदाज किती खरे ठरतात. यावर शंका असली, तरी या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरी मात्र शेतकरी यावर मोठा विश्वास ठेवतात.