Video: 5 जणांचा जीव घेणारी बोलेरो गाडी ट्रकवर कशी धडकली? बुलडाण्याचा भीषण अपघात CCTV मध्ये कैद

हा अपघात कसा झाला ? याचे याचि देही याचि डोळा चित्रण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या सीसीटीव्ही (CCTV)मध्ये अपघाताची भीषणता स्पष्ट दिसत आहे.

Video: 5 जणांचा जीव घेणारी बोलेरो गाडी ट्रकवर कशी धडकली? बुलडाण्याचा भीषण अपघात CCTV मध्ये कैद
बुलडाण्याचा भीषण अपघात CCTV मध्ये कैद
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 6:39 PM

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा – जालना रोडवरील बायपासवर आज सकाळी भीषण अपघात (Accident) झाला. मालवाहू ट्रक (Truck) आणि बोलेरो (Bolero) जिपमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण ठार झाले तर 4 जण जखमी झाले आहेत. मात्र हा अपघात कसा झाला ? याचे याचि देही याचि डोळा चित्रण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या सीसीटीव्ही (CCTV)मध्ये अपघाताची भीषणता स्पष्ट दिसत आहे. (Horrific accident in Bolero car and truck in Buldana captured on CCTV)

अपघातात 5 ठार तर 7 जण जखमी

शेगावला व्यसनमुक्ती केंद्रात दोघांची दारु सोडवण्यासाठी दोन कुटुंब बोलेरो गाडीतून चालले होते. यावेळी शेगावच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो जीप आणि जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार तर 7 जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी साडे पाचच्या सुमारास देऊळगाव राजा जालना बायपासजवळ हॉटेल विजयसमोर घडली. अपघातातील मयत आणि जखमी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रोहणवाडीचे रहिवाशी आहेत.

बोलेरो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

या अपघाताचे cctv फुटेज समोर आले आहे. बोलेरो चालक हा लेन सोडून भरधाव वेगाने गाडी दामटत होता. त्‍यातच त्याचे नियंत्रण सुटून तो ट्रकला समोरासमोर जाऊन धडकला. यामध्ये कार चालकासह चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश गरिबदास लिहणार असे बोलेरो चालकाचे नाव आहे. त्याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोलेरो गाडीतील कुटुंब शेगावला दर्शनासाठी चालले होते

या घटनेमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, रोहणवाडीतील पाडमुख कुटुंब बोलेरोने नातेवाईकांसह शेगावला दर्शनासाठी जात होते. अर्जुन जयंतराव पाडमुख (60), त्‍यांची पत्‍नी कांताबाई (55), मुलगा श्रीमंत (45) यांच्यासह कुलदीप अर्जुन गायकवाड (32), बोलेरो चालक आकाश गरीबदास लिहणार (21) अशी अपघातात ठार झालेल्या पाच जणांची नावे आहेत. तर आम्रपाली विठ्ठल पाडमुख (35), मीनाबाई श्रीमंत पाडमुख (35), अशोक गरीबदास लिहणार (26), तुकाराम बाबुराव खांडेभराड (40), मीराबाई परमेश्वर बाळराज (40), बाबुराव श्रीपत कापसे (50), परमेश्वर कचरूबा बाळराज (39) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. (Horrific accident in Bolero car and truck in Buldana captured on CCTV)

इतर बातम्या

Nagpur Murder : पोटचा गोळा रोज घरात झिंगायला लागला, आई अन् भावानं त्याचा निकाल लावला

बारावीच्या केमिस्ट्रीचा पेपर फुटीचा प्रकार नाही , तर कॉपीचा प्रकार- बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.