Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना घोडा, ना गाडी, ना हेलिकॅप्टर; नवऱ्या मुलाची वरात ठरली चर्चेचा विषय

ग्रामीण भागात घोडा किंवा गाडीला महत्त्व दिले जाते. याहून वेगळी अशी वरात काढली की तो चर्चेचा विषय होतो. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली.

ना घोडा, ना गाडी, ना हेलिकॅप्टर; नवऱ्या मुलाची वरात ठरली चर्चेचा विषय
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 7:12 PM

गणेश सोळंखी, प्रतिनिधी, बुलढाणा : लग्न म्हटलं की आनंदाचा क्षण. त्यामुळे जो तो आपली हौस करण्याचा प्रयत्न करतो. नवरदेव असो की नवरी दोघांनाही या क्षणाची उत्सुकता असते. छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. आधी बैलगाडीतून वरात काढण्यात येत होती. आता ग्रामीण भागात ट्रॅक्टरचे प्रमाण वाढले. त्यानंतर कारमधून नवरदेव सहसा जातो. पण, हौसेखातर घोड्यावर नवरदेवाला बसवले जाते. श्रीमंत लोकं तर चक्क हेलिकॅप्टरचाही वापर करतात. पण, ग्रामीण भागात घोडा किंवा गाडीला महत्त्व दिले जाते. याहून वेगळी अशी वरात काढली की तो चर्चेचा विषय होतो. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. या वरातीची चर्चा सर्वत्र होत आहे.

BULDANA 2 N

बैलगाडीतून निघाली वरात

लग्न म्हटलं की नवरदेवाची घोड्यावरून मिरवणूक ही जणू काही प्रथाच झाली आहे. कधी कधी तर घोडा नसल्याने रुसवे फुगवेदेखील आपण पाहिले आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील नवरदेवाची वरात घोडा न सांगता निघाली. पण ही वरात मोठ्या हर्ष उल्हासात बैलगाडीतून काढण्यात आली.

हे सुद्धा वाचा

शरद पाटील बसले बैलगाडीत

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील ही घटना. मनोहर रुस्तम पाटील यांचा मुलगा शरद याचा विवाह धोडप येथील गणेश गारडे यांची मुलगी प्रियंका हिच्याशी आज झाला. त्यामुळे नवरदेव आपली वरात घेऊन निघाला.

ढोल-ताश्याच्या तालावर धरला ठेका

शरद पाटील यांच्या मित्राने नवरदेवाची घोड्यावरून नव्हे तर बैलगाडीतून वरात काढली. बैल गाडीला सजवून त्यातून ढोल ताशांच्या तालावर ठेका धरण्यात आला. गावातून ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वऱ्हाड्यांचे चांगलेच मनोरंजन झाले.

या लग्नात वरात पायी चालत होती. ढोल-ताशाचा गजर सुरू होता. नवरदेव बैलगाडीत बसला होता. त्याच्यासोबत आणखी काही जण गाडीत बसले होते. एकाने गाडीचे सारथ्य केले. या सर्व प्रकाराची गावात चांगलीच चर्चा रंगली.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.