Buldana Crime | उधारीवर शेतमाल दिला, व्यापारी चुकारा न देता पळाला, बुलडाण्यात 10 कोटींपेक्षा जास्त फसवणूक

व्यापारी संतोष रानमोडे याने दिलेले चेक बाऊन्स झाले. आज देतो उद्या देतो, असे सांगितले. त्यामुळे शेतकरी midc त असलेल्या गोडाऊनला गेले. त्याठिकाणी काहीच माल नव्हता तर संतोष रानमोडे मोबाईल ही उचलत नाही. काही वेळाने मोबाईलही नॉट रीचेबल झाल्याने शेतकरी आत्ता पेरणीपूर्वीच अडचणीत आलेत.

Buldana Crime | उधारीवर शेतमाल दिला, व्यापारी चुकारा न देता पळाला, बुलडाण्यात 10 कोटींपेक्षा जास्त फसवणूक
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 3:38 PM

बुलडाणा : दरवर्षी शेतकऱ्याकडून उधार शेतमाल घेऊन त्यांना घरपोच पैसे व्यापारी देत होते. लोकांचा विश्वास संपादन करणारा व्यापारी संतोष रानमोडे याने शेतकऱ्यांना चांगलाच इंगा दाखवला. त्यांना वाढीव रुपयाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा शेत माल खरेदी करून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेतकऱ्यांना दिलेली मुदत संपूनही घरपोच रक्कम पोहचती केली नाही. त्यातच आता त्याचा मोबाईलदेखील लागत नाही. संशय आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच्या गोडाऊनवर (Godown) धाव घेतली. हा व्यापारी फरार झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलाय. चिखली (Chikhali), बुलडाणा, देऊळगाव राजा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापारी संतोष रानमोडे (Santosh Ranmode) याने घेतला. मात्र आता 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन तो फरार झाला. ऐन पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना असं गंडविण्यात आलं. शेतकऱ्यांना या हंगामातील बी बियाण्यांसाठी इतरांपुढे जाता पसरावा लागत आहे.

कुणी 10, तर कुणी 20 लाखांचा माल दिला

गेल्या पाच ते सहा वर्षापासून शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तुर, चनासह इतर माल खरेदी केला. नंतर त्यांना पैसे देणाऱ्या संतोष रानमोडे या भामट्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. दरवर्षीचा व्यवहार असल्याने यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी देखील मोकळ्या मनाने या व्यापाराला आपला माल विकला. चिखली तालुक्यातील गांगलगावचा नातेवाईक असल्याचे बोलबच्चन करीत शेतकऱ्यांनीसुध्दा त्याला आपला माल दिला. काही तर 10 लाख, 20 लाख, 50 लाखांचा शेतमाल त्याला दिला होता.

मोबाईलही नॉट रीचेबल

नंतर मात्र व्यापारी संतोष रानमोडे याने दिलेले चेक बाऊन्स झाले. आज देतो उद्या देतो, असे सांगितले. त्यामुळे शेतकरी midc त असलेल्या गोडाऊनला गेले. त्याठिकाणी काहीच माल नव्हता तर संतोष रानमोडे मोबाईल ही उचलत नाही. काही वेळाने मोबाईलही नॉट रीचेबल झाल्याने शेतकरी आत्ता पेरणीपूर्वीच अडचणीत आलेत. यासंदर्भात आता फसवणूक झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी पोलिसांत धावा घेतलीय. त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भागवत वाघमारे यांच्यासह फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.