जामोदवरुन बुऱ्हाणपूरला जात होते, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन्…

बोलेरो गाडीने सहा जण जामोदवरुन बुऱ्हाणपुरला चालले होते. यावेळी निमखिडी खेड्याजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन् गाडी पुलावरुन खाली कोसळली.

जामोदवरुन बुऱ्हाणपूरला जात होते, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन्...
बोलेरो गाडीच्या अपघातात महिला ठारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 10:42 PM

गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद-बुऱ्हाणपूर मार्गावर शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगातील बोलेरो गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीमधील ८५ वर्षीय वृद्ध प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर इतर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु केला आहे. लावतीबाई श्रीराम टेकाळे असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.

पुलावरून खाली कोसळली बोलेरो

जळगाव जामोद-बुऱ्हाणपूर हा वर्दळीच्या मार्गांपैकी एक मार्ग आहे. या मार्गावरून भरधाव वेगाने गाड्या चालवल्या जातात. अशाच भरधाव बोलेरो गाडीला निमखिडी फाट्याजवळ अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव बोलेरो पीकअप गाडी पुलावरून खाली पलटी झाली. त्यात आतील प्रवासी त्याखाली अडकले गेले. अपघातात 85 वर्षीय लावतीबाई श्रीराम टेकाळे या वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली. या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही वृद्ध महिला खामगाव तालुक्यातील पद्मापूर गावची रहिवाशी असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर महिलेचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.

नांदेड-हिंगोली महामार्गावर एसटीला ऑटोची धडक

नांदेड-हिंगोली महामार्गावर एका ऑटोने एसटीला जोराची धडक दिल्याने ऑटोमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. बाळापुरकडून एसटी महामंडळाची बस कळमनुरीकडे जात असताना घटना घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.