Video | बुलडाण्यात RTO, पोलिसांची हेल्मेट जनजागृती, पोलिसांनी काढली मोटारसायकल रॅली

बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांनी जनजागृती रॅली काढली. हेल्मेट वापरा, अपघात टाळा असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. हेल्मेट न वापरल्यास जीवास धोका होतो. शिवाय विनाहेल्मेट प्रवास केल्यास आता दंडही भरावा लागेल, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

Video | बुलडाण्यात RTO, पोलिसांची हेल्मेट जनजागृती, पोलिसांनी काढली मोटारसायकल रॅली
बुलडाण्यात पोलिसांनी हेल्मेट जनजागृती रॅली काढली.
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 3:43 PM

बुलडाणा : राज्यासह आता बुलडाण्यातही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन (Sub-Regional Transport) आणि पोलिसांकडून जनजागृती रॅली (Awareness Rally) काढण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. संपूर्ण राज्यभरात हेल्मेट सक्ती संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आज बुलडाणा शहरात उपप्रादेशिक परिवहन आणि पोलीस विभागामार्फत शहरातून हेल्मेट वापरा संदर्भात जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. बुलडाणा जिल्हाधिकारी (Buldana Collector) तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवत मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

हेल्मेटअभावी अपघातात जीव जातो

कायद्यानुसार हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. पण, काही लोकं हेल्मेट वापरत नाहीत. त्यामुळं अलीकडच्या काळात हेल्मेट अभावी अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन उपप्रादेशिक अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांनी जनजागृती रॅली काढली. हेल्मेट वापरा, अपघात टाळा असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. हेल्मेट न वापरल्यास जीवास धोका होतो. शिवाय विनाहेल्मेट प्रवास केल्यास आता दंडही भरावा लागेल, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

पाहा व्हिडीओ

हेल्मेट वापरा, जीव वाचवा

हेल्मेट वापरल्यास अपघातझाला तरीसुद्धा होणारे नुकसान फार कमी असते. डोक्याला मार लागला नाही, तर जीव वाचविणे शक्य होते. त्यामुळं ही हेल्मेटची सक्ती आहे. या नियमांचं जनतेनं पालन करावं, यासाठी पोलिसांनी स्वतः शहरात जनजागृती केली.

चंद्रपुरातील पवनपार, मरेगाव, गुंजेवाहीतील सापडलेल्या वस्तू सारख्याच; जिल्हा प्रशासनाने ISRO दिले पत्र

Raosaheb Danve on Raj Thackeray: राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा नारा, गडकरींची भेट, मनसे-भाजप युती होणार का?; रावसाहेब दानवेंकडून पहिलंच मोठं विधान

Sujay Vikhe VIDEO: तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो, सुजय विखेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, मोदींच्याच रॅलीचं उदाहरण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.