Video : Buldana Burning Car | पोलीस कोविड सेंटर परिसरातील उभ्या कारला आग; खामगावात कार जळून खाक
बारादरी परिसरात असलेल्या कारला आग लागली. सुरुवातीला ही आग हळूहळू होती. त्यानंतर त्या आगीने मोठा पेट घेतला. दरम्यान, अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत कार जळून खाक झाली होती.
बुलडाणा : खामगाव शहरातील पोलीस कोविड सेंटर (Police Covid Center) परिसरात उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला. त्यामुळं कार जळून खाक झालीय. यामुळे ही बर्निंग कार (Burning Car) पालिकेचा अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आगीत भस्मसात झालीय. कारमधील गॅसकिटमधून ज्वलनशील गॅसची हळूहळू गळती होऊन अचानक आगीने भडका घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील बारादरी (Baradari in Khamgaon) भागात असलेल्या पोलिसांच्या वसाहतीजवळील कोविड सेंटर परिसरात उभ्या असलेल्या कारला काल दुपारी अचानक आग लागली. धुराचे लोळ उठत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले. त्याठिकाणी गाडीने पेट घेतलेला त्यांना दिसून आला.
पाहा व्हिडीओ
बुलडाणा पोलीस कोविड सेंटर परिसरातील उभ्या कारला आग pic.twitter.com/qwTnrty2sx
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) May 14, 2022
कार निलसिंग चव्हाण यांची
नागरिकांनी त्वरित अग्निशमक विभागाशी संपर्क साधला. याची माहिती अग्निशमन दलाला दिली. मात्र अग्निशमन दल उशिरा घटनास्थळी पोहोचला. त्यामुळं आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरात उभी असलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली. ही कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या नीलसिंग चव्हाण यांची असल्याची माहिती मिळाली. गाडीचे जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीत कार जळून खाक
बारादरी परिसरात असलेल्या कारला आग लागली. सुरुवातीला ही आग हळूहळू होती. त्यानंतर त्या आगीने मोठा पेट घेतला. दरम्यान, अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. त्यामुळं ही आग आटोक्यात येऊ शकली नाही. कार जळून पूर्णपणे खाक झाली. लोकं पेटताना असलेली कार पाहत राहिले. फोटो, व्हिडीओ काढत राहिले.