Buldana Crime | चंदन चोरण्यासाठी चोरटे आले, विरोध करताच दाखवला लोखंडी रॉड; बुलडाणा शहरालगतचा थरार…
पहाटेची वेळ होती. चोरटे आले. त्यांनी चंदनाचे लाकूड कापावयास सुरुवात केली. झाडं कापण्याचा आवाज अनाथ आश्रमातील चौकीदाराला आला. ते चोरट्यांच्या दिशेने गेले. कोण आहात म्हणून जाब विचारला. पण, चोरटे जबर होते. त्यांनी लोखंडी रॉड दाखविला. त्यामुळं चौकीदार शांत बसले.
बुलडाणा : शहराला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी अनेक प्रजातीची झाडे आहेत. त्यामध्ये चंदनाचाही समावेश आहे. बाजारपेठेत चंदनाच्या झाडाला मोठी किंमत मिळत आहे. चोरट्यांचा याकडे कल असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी देखील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांच्या शासकीय बंगल्यातील झाडे चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा, बुलडाणा शहराला लागून असलेल्या लव्ह ट्रस्ट (Love Trust) या अनाथ आश्रमामध्ये (Orphanage) 23 मेच्या रात्री साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आश्रमातील जाळीचे कुंपण तोडून आत प्रवेश केला. सुमारे सात वर्षांचे असलेले चंदनाचे झाड चोरून नेले. झाड तोडण्याचा आवाज ऐकून चौकीदार नारायण खिल्लारे (Narayan Khillare) गेले.
चोरटे रॉड घेऊन धावले
चोरटे रॉड घेऊन त्यांच्या अंगावर धावून आले. सोबतच आश्रमातील इतर महिला कर्मचाऱ्यांना देखील बाहेर येण्यास मज्जाव करण्यात आला. आश्रमाचे सर्व दरवाजे बाहेरून बंद करून टाकले. यानंतर चोरटे चंदनाचे झाड कापून फरार झाले. यामध्ये तीन ते चार आरोपी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही घटना cctv मध्ये कैद झालीय. दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस तपास करीत आहेत. अशी माहिती अनाथ आश्रमाच्या अधीक्षक कल्पना देशपांडे यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस लवकरच आरोपींचा शोध घेतील.
असा घडला थरार
पहाटेची वेळ होती. चोरटे आले. त्यांनी चंदनाचे लाकूड कापावयास सुरुवात केली. झाडं कापण्याचा आवाज अनाथ आश्रमातील चौकीदाराला आला. ते चोरट्यांच्या दिशेने गेले. कोण आहात म्हणून जाब विचारला. पण, चोरटे जबर होते. त्यांनी लोखंडी रॉड दाखविला. त्यामुळं चौकीदार शांत बसले. चंदनाच्या झाडाला मोठी किंमत मिळते. त्यामुळं चंदन विक्री करून पैसे कमविण्याच्या उद्देशाने ही चोरी केली असावी. या चोरांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी याची तक्रार बुलडाणा शहर पोलिसांत केली आहे. या तक्रारीवरून पोलीस तपास करत आहेत.