MLC Akola : वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळली, निवडणूक होणार चुरशीची

अकोला, बुलडाणा, वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका नगरसेवक पराग कांबळे व रमेश बजाज यांनी दाखल केली होती. ती याचिका सोमवारी नागपूर हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

MLC Akola : वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळली, निवडणूक होणार चुरशीची
वसंत खंडेलवाल व गोपिकीसन बाजोरिया
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 6:10 AM

अकोला, बुलढाणा, वाशीम विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात भाजपातर्फे वसंत मदनलाल खंडेलवाल यांनी 22 नोव्हेंबरला नामांकन अर्ज सादर केला. सदर नामनिर्देशन अर्जाची छाननी करण्यात आली आणि छाननीदरम्यान या मतदारसंघातील मतदारांपैकी एक असलेले नगरसेवक पराग मधुकर कांबळे यांनी भाजपा उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जाच्या मान्यतेवर आक्षेप नोंदवला. त्याचप्रमाणे रमेश सत्यनारायण बजाज यांनी देखील आक्षेप नोंदविला होता. परंतु, ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली.

अकोला, बुलडाणा, वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका नगरसेवक पराग कांबळे व रमेश बजाज यांनी दाखल केली होती. ती याचिका सोमवारी नागपूर हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

पराग कांबळे, रमेश बजाज यांची याचिका

रमेश बजाज हे महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकीसन बाजोरिया यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत, तर हे दोन्ही आक्षेप रिटर्निंग ऑफिसरने फेटाळले. रिटर्निंग अधिकाऱ्याने दिलेल्या आक्षेपांना नकार देण्यास अनुक्रमे पराग मधुकर कांबळे आणि रमेश सत्यनारायण बजाज यांनी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात दोन स्वतंत्र रिट याचिकांद्वारे उमेदवारी अर्जाला आव्हान दिले होते. मात्र सोमवारी उच्च न्यायालयाने दोन्ही रीट याचिका फेटाळून लावल्या असल्याने आता या निवडणुकीत अजूनच चुरस वाढली आहे.

बाजोरिया-खंडेलवाल सामना रंगणार

यावेळी ही निवडणूक दोन्ही उमेदवारांच्या प्रतिष्ठेची आहे. गेल्या 18 वर्षापासून महाविकास आघाडीचे उमेदवार गोपिकीसन बाजोरिया हे आमदार आहेत. यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती नसल्यानं दोन चांगले मित्र आणि शेजारी हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. वसंत खंडेलवाल हे एक सराफाचे व्यापारी आहेत. सुरुवातीपासून भाजपशी जुडले आहेत. ते नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं ही निवडणूक ठाकरे विरुद्ध गडकरी अशीच चर्चा सर्व दूर आहे. तर दोन्ही उमेदवार एकमेकांवर ताशेरे ओढायला कुठलीच कसर सोडत नाहीत. ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे. यामध्ये कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खुर्चीला हात-पाय बांधून नातवानेच गळा चिरला, नागपुरातील महिला डॉक्टरच्या हत्येचं गूढ उकललं

प्रतिस्पर्धी टोळीशी हातमिळवणीचा संशय, नागपुरात कुख्यात गुंडाकडून मेकॅनिकची हत्या

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.