Buldhana Accident : बुलढाण्यातील मढ फाट्याजवळ अपघातात, 3 जण ठार तर एक गंभीर जखमी
दुचाकीवर स्वार असलेले 4 जणांपैकी पती, पत्नीसह त्यांचे नातेवाईक असलेली दोन मुलं हे कोलवडवरुन औरंगाबाद जिल्ह्यातील आपल्या पानवडद या गावी जात होते. यावेळी बुलडाणा-अजिंठा या राष्ट्रीय महामार्ग त्यांच्या दुचाकीला टिप्परने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
बुलढाणा : गिट्टी घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या धडकेत दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी आहे. बुलडाणा-अजिंठा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 653 वरील मढ फाट्याजवळ हा अपघात (Accident) घडला. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. पानवड येथील ज्ञानेश्वर सुरोशे (40) यांच्यासह 11 वर्षीय आणि 13 वर्षीय मुलाचा मृत्यू (Death) झाला. तर वनिता ज्ञानेश्वर सुरोशे ही महिला गंभीर जखमी (Injured) असून तिला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले आहे. महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे.
औरंगाबादला आपल्या गावी जात असताना टिप्परने दुचाकीला उडवले
दुचाकीवर स्वार असलेले 4 जणांपैकी पती, पत्नीसह त्यांचे नातेवाईक असलेली दोन मुलं हे कोलवडवरुन औरंगाबाद जिल्ह्यातील आपल्या पानवडद या गावी जात होते. यावेळी बुलडाणा-अजिंठा या राष्ट्रीय महामार्ग त्यांच्या दुचाकीला टिप्परने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळावर अनेकांनी गाडी थांबवून घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढला. मात्र अपघातग्रस्तांना उचलून मदत करायला कोणीही तयार नव्हते. सर्व जण मोबाईलमध्ये तडफडणाऱ्यांचा व्हिडिओ काढण्यात मग्न होते. (Three killed, one seriously injured in Buldhana two-wheeler accident)