आधी मुलीने बापाविरुद्ध दंड थोपाटले, आता पुतणीचं थेट चुलत्याला चॅलेंज; विधानसभा निवडणुकीत जाळ आणि धूर संगाटच

Family Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. प्रत्येक पक्ष प्रत्येक मतदारसंघासाठी सुक्ष्म नियोजन करत आहे. त्यात भाजपने आघाडी घेतली असली तरी शरद पवार यांनी पण अनेक मतदारसंघात राजकारणाची साखरपेरणी केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

आधी मुलीने बापाविरुद्ध दंड थोपाटले, आता पुतणीचं थेट चुलत्याला चॅलेंज; विधानसभा निवडणुकीत जाळ आणि धूर संगाटच
काक पुतणीमध्ये सामना
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 3:42 PM

विदर्भावर भाजपचं नाही तर महाविकास आघाडी सुद्धा मोठा डाव खेळत आहे. एक एका मतदार संघाची बांधणी सुरू आहे. भाजपने राज्यात सुक्ष्म नियोजनावर भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा लागलीच कामाला लागली आहे. पण शरद पवार यांनी अनेक मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना पुढे केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात पवारांचा मास्टरस्ट्रोक कुणाचे मोठे नुकसान करतो हे समोर येईलच. पण विदर्भात मुलगी आणि वडिलांचा सामना निश्चित झाल्यानंतर आता काका आणि पुतणी यांच्यात सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

विदर्भात अनेक मतदारसंघात मोठा ट्विस्ट

विदर्भातील अनेक मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने मोठा सुरूंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरुद्ध त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अगोदरच अंबरीशराजे यांनी दंड थोपाटलेले असताना भाग्यश्री यांनी पण पिक्चर अभी बाकी है, असाच इशारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

तर दुसरीकडे जिजाऊ माँ साहेबांचं आजोळ असलेल्या सिंदखेड राजा येथे पण मोठ्या घडामोडी घडत आहेत. या मतदारसंघात शिंगणे कुटुंबियांचा वरचष्मा आहे. सहकार महर्षी भास्करराव शिंगणे आणि त्यांच्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे यांना या मतदारसंघाने साथ दिली आहे. पण यंदा शिंगणे कुटुंबातच विधानसभेला सामना रंगणार आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात पुतणी गायत्री शिंगणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतदार संघात हवा बदल

सिंदखेड राजा मतदार संघात आता बदल पाहिजे. मागील 25 वर्षात विकास कुठेच दिसत नाही. डॉ. शिंगणे यांनी विकासाची पाच कामे तरी दाखवावीत. त्यांनी एक रुपयाचा ही विकास केला नाही. भूमिपूजन करणे, नारळ फोडणे, एव्हढेच काम त्यांनी केले. निवडणूक आलीं की डॉक्टर शिंगणे रडतात आणि भास्करराव शिंगणे यांचे नावाने मत मागतात, अशी खरमरीत टीका गायत्री शिंगणे यांनी काकांवर केली आहे.

वडिलांचे नावाने किंवा आजोबांचे नाव मत मागण्याचा माझा गुण नाही. तुमच्या वडिलांनी ज्या गोष्टी केल्या त्या तुम्ही बंद पाडल्या. त्यांनी शंभर टक्के फसवणूक केली आहे. प्रतिसाद नसल्याने त्यांची मानसिकता बिघडली आहे. मला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. इतर मतदार संघ 25 वर्षात सुधारले, मग सिंदखेड राजा मतदार संघ का नाही सुधारला? असा रोकडा सवाल त्यांनी केला.

मला तिकीट मिळणारच

शरद पवार यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा झाली. कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मी त्यांच्याकडे तिकीटाची मागणी केली आहे आणि शरद पवार हे मला तिकीट देतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात भास्करराव शिंगणे आणि शरद पवार यांचे नाव आहे, त्यामुळे आपण शंभर टक्के निवडून येणार असा दावा त्यांनी केला.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.