Video : Buldana rain | पहिल्याच पावसात घरात घुसले पाणी, मलकापुरात मुसळधार, देवधाबा येथील नागरिकांची दाणादाण

मलकापूर तालुक्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळं शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला. पण, देवधाबा येथे विचित्र परिस्थिती पाहावयास मिळाली. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले.

Video : Buldana rain | पहिल्याच पावसात घरात घुसले पाणी, मलकापुरात मुसळधार, देवधाबा येथील नागरिकांची दाणादाण
देवधाबा येथील नागरिकांची दाणादाण Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 4:19 PM

बुलडाणा : विदर्भात सुर्याचा प्रकोप कायम असताना बुलडाण्यात पावसानं हजेरी लावली. मलकापूर तालुक्यात चांगलाच पाऊस पडला. या पावसानं काहींची गैरसोय झाली. पण, शेतकरी (Shetkari) वर्गात आनंदाचं वातावरण आहे. जिल्ह्यातील देवधाबासह परिसरात दुपारच्या वेळी मुसळधार (Musaldhar) पाऊस झाला. गावकऱ्यांना मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे त्रास सहन करावा लागला. ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वीच्या कामाकडे दुर्लक्ष केले. पडलेल्या पावसाचे पाणी थेट घरात घुसले. घरातील साहित्य ओले झालेत. मलकापूर तालुक्यातल्या देवधाबा (Devdhaba) ग्रामपंचायातच्या ढिसाळ कारभाराचा फटका देवधाबावासीयांना बसला. पहिल्याच पावसात नाल्याचे पाणी घरात घुसले. नाल्यांची साफसफाई न केल्याने असा प्रकार घडला. गाळ साचून तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी तसेच गटाराचे पाणी हे रस्त्यावरून वाहिले.

पाण्याला उग्र वास

काही पाणी नागरिकांच्या घरात घुसले. यामुळे गटारीमधील घाण आणि त्याचा उग्र वास नागिरकाना सहन करावा लागला. पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत घरी जावे लागले. नागरिकांच्या घरात घाण पाणी घुसले. आरोग्याचा धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. एव्हढेच काय या मुसळधार पावसाने नाले, ओढेसुद्धा तुडुंब वाहू लागले.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ

रस्त्यावर गुडघाभर पाणी

उन्हाळा अद्याप संपलेला नाही. सूर्य तापणे विदर्भात सुरुच आहे. पण, मलकापूर तालुक्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळं शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला. पण, देवधाबा येथे विचित्र परिस्थिती पाहावयास मिळाली. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागला. नाल्या चोक झाल्यानं हा प्रकार घडल्याचं नागरिकांनी सांगितली. पावसाळ्याच्या आधी नालेसफाई करावी लागते. पण, ती झाली नसल्यानं नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.

रस्ता वाहून गेल्यानं पाच गावांचा संपर्क तुटला

पहिल्याच पावसात लोणार तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटला. पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेला. त्यामुळं वाहतूक ठप्प झाली. कोनाटी, झोटिंगा, देऊळगाव कोळ, महार चिकना गावाकडं जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्वरित पर्यायी रस्ता तयार करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.