तुम्ही इस्टेटीचे वारसदार, आम्ही हिंदुत्वाचे, मंत्री गुलाबराव पाटलांनी यांना सुनावले
आदित्य ठाकरे यांचे वय 32 आणि माझं शिवसेनेतील वय 35.
गणेश सोळंकी, Tv9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा : कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) चांगलीच तोफ डागलीय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आम्हाला गद्दार म्हणत आहेत. बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा मला अधिकार नाही, असेही म्हणत आहेत. मात्र तुम्ही बाळासाहेबांची केवळ इस्टेटीचे वारसदार आहात. मात्र आम्ही हिंदुत्वाचे आणि त्यांच्या विचाराचे वारसदार आहोत, आम्ही काही ऐरे गैरे, नथ्थू खैरे नव्हतो. पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
आमच्यावर 100 पेक्षा जास्त केसेस
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शिंदे गटाच्या शिवसेनेची हिंदु गर्वगर्जना संपर्क यात्रा अभियान निमित्त राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आले होते. यावेळी माजीमंत्री अर्जुनराव खोतकरांसह खासदार प्रतापराव जाधव, आमदारांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सायकलवर फिरून आम्ही शिवसेना मोठी केली. 100 पेक्षा जास्त केसेस आमच्यावर आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर एक तरी केस दाखवा. असाही प्रश्न गुलाबराव पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना केलाय.
माझं शिवसेनेतलं वय 35
शिवाय आदित्य ठाकरे यांचे वय 32 आणि माझं शिवसेनेतील वय 35. आदित्य ठाकरे आम्हाला आमच्यावर टीका करतो. अरे कोण हा आदित्य ठाकरे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारलाय.
एकनाथ शिंदे कोण? जेव्हा शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एकनाथ शिंदे यांचे पर्व लिहिले जाईल, असा टोलाही पाटील यांनी लगावलाय.
एकनाथ शिंदे कोण? जेव्हा शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एकनाथ शिंदे यांचे पर्व लिहिले जाईल, असा टोलाही पाटील यांनी लगावलाय.