महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींच्या प्रकल्पानंतर 80  हजार नोकऱ्या देणाऱ्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पही गेला 

रायगडमधील बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडे नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडे नेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींच्या प्रकल्पानंतर 80  हजार नोकऱ्या देणाऱ्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पही गेला 
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 8:47 PM

मुंबई :  वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आणखी मोठा प्रोजेक्ट राज्याबाहेर गेल्याची चर्चा आहे. बल्क ड्रग पार्क(Bulk Drug Park ) प्रकल्पही सरकारने घालवला असल्याचा दावा युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

वेदांता प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. राज्यात येणारा वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? सरकारकडून अद्याप याचं उत्तर मिळालं नसल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

40 आमदारांसोबत राज्यातील 2 प्रकल्पही पळवले. जीत कर हारने वाले को खोके सरकार कहते है, असं म्हणत बल्क ड्रग पार्क प्रकल्पावरुनही आदित्य ठाकरेंनी मोठा आरोप केला आहे.

रायगडमधील बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडे नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडे नेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

केंद्र सरकारबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे 80 हजार रोजगार महाराष्ट्रातून निघून गेले आहेत. अजूनही महाराष्ट्रातील तरूण शांत आहेत. पण त्यांचा अंत नका पाहू नका असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

‘बल्क ड्रग पार्क’साठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारशी पत्र व्यवहार केला होता. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. रायगडमध्ये हा प्रकल्प होता.

हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी प्रस्ताव पाठवले होते. यात गुजरात कुठेच शर्यतीत नव्हता. पण आता हा प्रकल्प गुजरातमधील भरुच इथं होणार आहे.

या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्रानं पहिल्यांदा केली असताना हा प्रकल्प गुजरातला कसा गेला? याचे उत्तर द्यावे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

काय आहे बल्क ड्रग पार्क प्रकल्प

बल्क ड्रग्ज ही एक औषधांची सामग्री आहे. जसं पॅरासिटॉमॉल हे बल्क ड्रग्ज आहे. ज्याद्वारे इतर औषधींचं कॉम्बिनेशनही तयार केलं जातं. बल्क ड्रग्जचा वापर गोळ्या, कॅप्सूल आणि सिरप तयार करण्यासाठीही केला जातो. कुठलंही औषध तयार करण्यासाठी बल्क ड्रग्जची महत्वाची भूमिका असते. यामुळे औषध निर्मिती क्षेत्रासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.