CCTV Video : नागपूरमध्ये मेडिकल शॉपमध्ये चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ड्रॉव्हरमध्ये असलेली रक्कम सोबत आणलेल्या बॅगमध्ये भरली आणि बॅग खांद्याला लटकवत बाहेर पडले. जवळपास 5 लाखाची रक्कम दुकानात असल्याचे मॅनेजरने सांगितले.

CCTV Video : नागपूरमध्ये मेडिकल शॉपमध्ये चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
नागपूरमध्ये मेडिकल शॉपमध्ये चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 6:52 PM

नागपूर : मेओ रुग्णालयाच्या समोर असलेल्या मेडिकल (Medical) शॉपमध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी (Theft) केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. चोरांनी मेडिकलमधील विविध ड्रॉव्हरमधील रोख रक्कम चोरुन पोबारा केला. चोरीची संपूर्ण घटना मेडिकलमधील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी तहसिल पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. रुग्णालय परिसरात रात्रीच्या वेळी सुद्धा गजबज असते. अशावेळी अगदी रस्त्यावर असलेल्या दुकानात चोरी होते. यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु

रात्रंदिवस गजबलेला असलेल्या मेओ रुग्णालयाच्या समोर मोठं मेडिकल शॉप आहे. या मेडिकल शॉपमध्ये पहाटेच्या वेळी चोरट्यांनी शटर उघडून चोरी करण्याची हिंमत केली आहे. महत्वाचं म्हणजे संपूर्ण चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पहाटे तीन जण या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी शटर उघडलं एक बाहेर थांबला तर दोन जण आत घुसले. त्यांनी वेगवेगळ्या ड्रॉव्हरची झडती घेतली. ड्रॉव्हरमध्ये असलेली रक्कम सोबत आणलेल्या बॅगमध्ये भरली आणि बॅग खांद्याला लटकवत बाहेर पडले. जवळपास 5 लाखाची रक्कम दुकानात असल्याचे मॅनेजरने सांगितले. पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे या चोरांचा शोध घेत आहेत.

भाईंदरमध्ये गुडविन कंपनीत चोरी

भाईंदरमधील गुडविन कंपनीमध्येही चोरीची घटना घडली आहे. दोन महिला सकाळच्या सुमारास कंपनीत आल्या. त्यापैकी एक महिला आत घुसली आणि दुसरी बाहेर पहारा देत थांबली. आत गेलेल्या महिलेने ऑफिसमधील महागड्या वस्तू चोरल्या. चोरीची संपूर्ण घटना ऑफिसमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे नवघर पोलीस आरोपी महिलांचा शोध घेत आहेत. (Burglary at medical shop in Nagpur, incident captured on CCTV camera)

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.