Maharashtra Budget 2023 : महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलत दिल्याने एसटीचा फायदा की तोटा ?

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाने मोफत प्रवास घडविल्याने एसटीचे प्रवासी वाढून एसटीला फायदा झाला होता, कसा काय ते पाहा...

Maharashtra Budget 2023 : महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलत दिल्याने एसटीचा फायदा की तोटा ?
MSRTC BUDGETImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 6:27 PM

मुंबई : एसटी महामंडळाच्या बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्धे तिकीट आकारण्यात येणार आहे. महिलांना प्रवासात सरसकट पन्नास टक्के सवलत दिल्याने एसटीचे प्रवासी निश्चितच वाढणार असून एसटीला उलट फायदाच होत आहे. त्यामुळे राज्याची ग्रामीण वाहीनी असलेल्या एस महामंडळाची प्रवासी संख्या वाढणार आहे. अलिकडेच महामंडळाने एसटीतून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास घडविण्याचा निर्णय घेतल्याने एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. एसटी जरी प्रवाशांना सवलत देत असली, तरी या सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकार करीत असते. त्यामुळे एसटी महामंडळाचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवास करणाऱ्या योजनेचे उद्घाटन गेल्यावर्षी 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या योजनेचा लाभ सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करायला मिळत आहे, तसेच या योजनेमुळे एसटीने एरव्ही प्रवास न करणारे ज्येष्ठ नागरिकही प्रवास करु लागले आहेत. त्यामुळे एसटीचे प्रवासी वाढले आहेत. कोरोनाकाळापूर्वी एसटीतून 65 लाख प्रवासी प्रवास करीत होते. सध्या एसटीचे रोजचे प्रवासी 55 लाख झाले आहेत. त्यामुळे सर्व 29 प्रकारच्या समाज घटकांच्या प्रवास सवलती देण्यापोटी महामंडळाला दर महिन्याला 220 कोटी राज्यसरकार देणार आहे. तसेच 100 कोटी रूपये कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून मिळणार आहे.

महिला प्रवाशांची नेमकी आकडेवारी आणि फायदा किती !

एसटी मंडळाच्या दररोज चालविण्यात येणाऱ्या सोळा हजार फेऱ्यांद्वारे रोज 55 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. या प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची संख्या नेमकी किती आहे आणि यातून किती महिला प्रवासी प्रवास करतील असे विचारले असता एसटीतील सूत्रांनी सांगितले की प्रवाशांचा अशी जेंडरवाईज वेगळी आकडेवारी काढली जात नाही. असेही राज्यात 12 वी पर्यंत विद्यार्थींना एसटीतून मोफत प्रवास आहे. अशा 12 वी पर्यंत एसटीने मोफत प्रवासाचा लाभ घेणाऱ्या मुलींची संख्या एक लाख आहे. 55 लाख प्रवाशांपैकी 30 लाख तरी महीला प्रवासी असतील असे सूत्रांनी सांगितले. मात्र या महिलांच्या संपूर्ण मोफत प्रवासाने महामंडळाला राज्य सरकारकडून नेमकी किती रक्कम प्रतिपूर्तीसाठी मिळेल हे आताच सांगणे अवघड असल्याचे म्हटले जाते.

अर्थसंकल्प 2023-2024

  • 100 बस स्थानकांच्या पुनर्बांधणी (upgradation) करिता 400 कोटी
  • 5150 electric बसचा समावेश आणि चार्जिंग स्टेशनची उभारणी
  • 5000 डिझेल गाड्यांचे सीएनजी आणि अन्य द्रवरूप इंधनात रूपांतरण
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.