‘मंत्रिमंडळ विस्ताराच्या आठ दिवसांपूर्वी शपथ घेण्याचा फोन, पण नंतर…’, आमदार रवी राणा यांनी सांगितला पडद्यामागील किस्सा
MLA Ravi Rana: विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेकांना वाटत होत, रवी राणाचा देखील पराभव व्हावा. परंतु मी विजयी झालो. माझी राजकारणात कोणाशी काहीही दुश्मनी नाही. अमरावतीचे नव्हे खासदार बळवंत वानखडे झाले. तेव्हा मी त्यांचा अभिनंदन केले होते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीचे २३० आमदार निवडून आले. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी दावेदारी वाढली. भाजपने १३२ जागा मिळवत विक्रम केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. त्यामुळे तिन्ही पक्षात मंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अमरावतीचे आमदार रवी राणा यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आले. त्याबाबत काय घडले ते रवी राणा यांनी रविवारी सांगितले.
आमदार रवी राणा म्हणाले, मला मंत्रिमंडळ विस्ताराच्या आठ दिवसांपूर्वी सांगितले होते की मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथ घ्यावी लागणार आहे. पण मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी सकाळी माझे नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. यावेळी थांबा भरपाई भविष्यात काढून देऊ. त्यामुळे यावेळी आपण मंत्री झाला नाहीआमदार बनून बनून मी त्रासलो आहे. मला देखील वाटते मी मंत्री झाले पाहिजे, असे रवी राणा यांनी म्हटले.
सर्वांनी एकत्र यावे- राणा
आमदार रवी राणा म्हणाले, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेकांना वाटत होत, रवी राणाचा देखील पराभव व्हावा. परंतु मी विजयी झालो. माझी राजकारणात कोणाशी काहीही दुश्मनी नाही. अमरावतीचे नव्हे खासदार बळवंत वानखडे झाले. तेव्हा मी त्यांचा अभिनंदन केले होते. जिल्ह्यात सर्व द्वेष मिटवून, सर्व माजी आमदारांनी आमदारांना सहकार्य केले पाहिजे. आपण एकमेकांचे पाय खेचत राहिले तर लोकांना न्याय देऊ शकत नाही. सर्वांनी एकत्र येऊन या जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी काम केले पाहिजे.
लोकांच्या मनातील स्थान महत्वाचे
आजच्याच दिवशी माझा राजकीय जन्म झाला आहे. युवा स्वाभिमान पार्टीचा जन्म झाला. निवडणुकीमध्ये मला लोकांनी खूप प्रेम दिले. माझ्या नावाच्या रांगोळ्या महिलांनी काढल्या होत्या. रस्ते सजवले होते. 2024 मध्ये सर्व जनता बडबेरामध्ये निवडणूकमध्ये उभे आहे, असे वाटत होते. मी किती वेळा निवडून आलो, या पेक्षा लोकांच्या मनात माझे स्थान किती आहे, हे महत्वाचे आहे, असे आमदार राणा यांनी सांगितले.
माणूस किती जगला यापेक्षा कोणासाठी जगला हे महत्वाचा आहे. अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार असो की तिवसा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच अमरावती जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने घरी चहा प्यायला बोलवले तर मी जाणार आहे. मी विरोधकानाही आवाहन करतो त्यांनी देखिल माझ्या गंगा सावित्री निवास्थानी चहा घ्यायला यावे, असे सांगत राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा सल्ला आमदार राणा यांनी दिला.