भारतातील पैलवानांचा खासबागेत शड्डू घुमणार; कोल्हापूरात होणार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा…
कोल्हापूरः राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृतिशताब्दी Centenary of Rajarshi Shahu Chhatrapati Maharaj) वर्षानिमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात (khasbag) यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील ‘मातीतील कुस्ती स्पर्धां’चे (Wrestling competitions in clay) आयोजन करण्यात येणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे व भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी […]
कोल्हापूरः राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृतिशताब्दी Centenary of Rajarshi Shahu Chhatrapati Maharaj) वर्षानिमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात (khasbag) यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील ‘मातीतील कुस्ती स्पर्धां’चे (Wrestling competitions in clay) आयोजन करण्यात येणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे व भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी याच बाबतीत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी बृजभूषण यांची भेट घेऊन राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कुस्तीसाठी दिलेले योगदान याबद्दल त्यांना माहिती दिली होती.
शाहू महाराजांनी कुस्तीला मोठं केले
कुस्ती या क्रीडा प्रकारच्या उद्धारासाठी महाराजांनी जे उत्तुंग कार्य केले आहे, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षात कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानात राष्ट्रीय स्तरावरील मातीतील कुस्ती स्पर्धा भरवावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी त्यांच्याकडे केलेली होती. त्यावेळीच त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली होती.
देशातील तीनशेपेक्षा जास्त मल्लांचा सहभाग
आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नोव्हेंबर महिन्यात आपण खासबाग मैदान कोल्हापूर येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी संभाजीराजे यांना दिली. पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांच्या या स्पर्धा होणार असून देशभरातील नामांकित असे 300 हून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील, असे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर कुस्तीची राजधानी
राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी कुस्तीला कोल्हापूरात वाढवलं आणि मोठं केलं आहे. त्यासाठीच कोल्हापूरला कुस्तीची राजधानी समजली जाते. देशभरातील विशेषतः उत्तर भारतातील अनेक मल्ल आजही कुस्तीसाठी कोल्हापूरात येतात. कोल्हापूरात कुस्ती शिकून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांनी यश संपादन केले आहे.
याबाबत पुढील नियोजन करण्यासाठी संभाजीराजे यांच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी व राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे सचिव यांची संयुक्त बैठक दिनांक 2 मे रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
संबंधित बातम्या
Sadabhau Khot : “अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशातला नाच्या”, सदाभाऊ खोतांची मिटकरींवर जहरी टीका