Cyclone Nisarga | केंद्रीय पथक रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी

केंद्रीय पथक कोकणच्या दौऱ्यावर येऊन निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे (Central Committee To Review Raigad Cyclone Nisarga affected Area)

Cyclone Nisarga | केंद्रीय पथक रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 8:14 AM

रायगड : रायगड जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक आज (मंगळवार 16 जून) रायगडमध्ये येणार आहे. (Central Committee To Review Raigad Cyclone Nisarga affected Area)

मुंबईहून भाऊचा धक्का मार्गे रो-रो बोटीने हे पथक अलिबागला येईल. सकाळी 10.40 वाजता नागावमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर चौल येथे पाहणी करुन मुरुड तालुक्यातील बोर्लीला जातील. त्यानंतर काशिद, नांदगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाईल.

दुपारी 2.15 वाजता मुरुड तालुक्यातील प्रकृती रिसॉर्टमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण केल्यानंतर मुरुड तालुक्यातील आगरदांडाकडे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाईल. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार, हरिहरेश्वर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पथकाचा रात्री महाड येथे मुक्काम असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागाव येथील नुकसानीची पाहणी केली. तसेच वादळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले.

संबंधित बातम्या :

Cyclone Nisarga | मुंबईवरचा धोका टळला, चक्रीवादळ पुढे सरकले : हवामान विभाग

Cyclone Nisarga | नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील घाट रस्त्यात दरड कोसळली

(Central Committee To Review Raigad Cyclone Nisarga affected Area)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.