फडणवीस यांना ‘धोका’, मात्र गडकरी यांना मोठी ऑफर… कुणी केला गौप्यस्फोट?

ज्या पार्टीचे सरकार येईल त्या पार्टीचा झेंडा घेऊन लोक उभे रहातात. मंत्री पद देतो म्हणाले की काही जण पक्ष बदलत आहेत. राजकारणात विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यतेचा अनुभव लोकांना जास्त येतोय.

फडणवीस यांना 'धोका', मात्र गडकरी यांना मोठी ऑफर... कुणी केला गौप्यस्फोट?
DEVENDRA FADNAVIS WITH NITIN GADKARIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 5:25 PM

पुणे : पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर मोठा आरोप केला. शरद पवार यांनी चार दिवस आधी सांगून नंतर ऐनवेळी ते मागे फिरले. त्यांच्या पुढाकारानेच राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता येणार होती, असा आरोप फडणवीस यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे पवार यांनी भाजपला धोका दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षात येण्यासाठी खुली ऑफर देण्यात आली होती अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. याची कबुली खुद्द नितीन गडकरी यांनी दिली आहे.

माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार सोहळा पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आयोजित करण्यात आला होता. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संजय जगताप, राहुल कुल, माजी आमदार विजय शिवतारे यावेळी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

पैसा कमवणे हा गुन्हा नाही. पण, पैसे कमवण्यासाठी राजकारण हे माध्यम नाही. ज्या पार्टीचे सरकार येईल त्या पार्टीचा झेंडा घेऊन लोक उभे रहातात. मंत्री पद देतो म्हणाले की काही जण पक्ष बदलत आहेत. राजकारणात विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यतेचा अनुभव लोकांना जास्त येतोय असे परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

जो पापे करतो तो पुढच्या जन्मात…

राजकारणात मी जॉर्ज फर्नांडिस यांना आयकॉन मानतो. विचारात मतभेद असले तरी चालते. समाजवादी पक्षात अनेक नेते होते. पण, काळाच्या ओघात ते मागे पडले. जे विचार घेऊन राजकारण करतात ते सगळ्यांसाठी सन्मानजनक असतात. जो पापे करतो तो पुढच्या जन्मात साखर कारखाना काढतो नाही तर वृत्तपत्र काढतो, असा टोलाही त्यांनी आपल्या भाषणात लगावला.

साखर कारखान्यांना मी सांगतो साखर कमी उत्पादन करा. साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे शोषण करता कामा नये. 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आपण तयार करणार आहे. चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे पुण्यातील सगळ्या रिक्षा आणि टू व्हीलर इथेनॉलवर करा म्हणजे प्रदूषण कमी होईल. सोनालीकाचा सीएनजी ट्रॅक्टर आला. आसाममध्ये बांबूपासून इथेनॉल तयार झाले. इथेनॉलपासून बायो एव्व्हेशन fual तयार होईल.

राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज

पुरंदरच्या भूमीने अनेक रत्नांना जन्म दिला आहे. आजूबाजूच्या लोकांनी दादांना हरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी दादा जाधवराव निवडून येत राहिले. आम्ही तिकीट देताना हा निवडून येईल का? हाच विचार करतो. लोक निवडून देतील असेच नेते लोकशाहीत नेते बनतील. राजकारणाची व्याख्या आता बदलण्याची गरज आहे, असे गडकरी म्हणाले.

इकडे ये तुला खूप मोठे भविष्य आहे

आमच्या घरात 5 मिनिटेही राजकारणावर चर्चा होत नाही. मुले कर्तुत्ववान असताना देखील काही वेळा त्यांच्यावर अन्याय होतो. जगला किती त्यापेक्षा जगला कसा हे महत्वाचे आहे. स्वातंत्र्यानंतर नंतर लोकांनी नेतृत्व केले ते विचार घेऊन राजकारण करायचे. मला काँग्रेसमध्ये ये तुला खूप मोठे भविष्य आहे असे एका नेत्याने सांगितले. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, माझं भविष्य नाही घडले तरी चालेल पण विचारांशी प्रतारणा करणार नाही. विचारांशी मी कधी फारकत घेतली नाही असेही त्यांनी सांगितले.

राजकारणात जातीचा वापर होता कामा नये. राजकारणात जातीय वाद होऊ नये. मला जर कुणी जात सांगितली तर मी म्हणतो मारेल धरून. या निवडणुकीत मी चहा पाजणार नाही. Flex लावणार नाही. जनतेला वाटले तर निवडून देतील. एखादी सत्ता डोळे उध्वस्त करू शकते. पण, डोळ्यामागचे विचार कोणीही काढू शकत नाही हे अंतिम सत्य आहे असे ते म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.