Nashikweather: नाशिक जिल्हा, खान्देशात पाऊस आजही जोरदार बॅटींग करण्याची शक्यता

नाशिक जिल्हा आणि खान्देशात (Nashik district) आज मंगळवारीही (14 सप्टेंबर) जोरदार पावसाची (heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील धरणे भरत आल्याने गोदावरी नदीला (Godavari) पूर आला आहे.

Nashikweather: नाशिक जिल्हा, खान्देशात पाऊस आजही जोरदार बॅटींग करण्याची शक्यता
नाशिकमध्ये सकाळपासून रिमझिम.
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 10:26 AM

नाशिकः नाशिक जिल्हा आणि खान्देशात (Nashik district) आज मंगळवारीही (14 सप्टेंबर) जोरदार पावसाची (heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील धरणे भरत आल्याने गोदावरी नदीला (Godavari) पूर आला आहे. (Chance of heavy rain in Nashik district and Khandesh)

सध्या मान्सूनचा आस असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. दक्षिण ते पश्चिमेपर्यंत दाब कमी आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे राज्यभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यात मराठवाडा वगळता बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर कमी तर मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारीही (14 सप्टेंबर) जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यात पावसाचा जोर वाढणार आहे. सोबतच खान्देशमध्येही पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच आज विदर्भासह नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये सकाळपासून भुरभुर पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे काल सोमवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

गोदावरीला पहिला पूर

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण , दारणा धरण, नांदूर-मधमेश्वर प्रकल्प भरत आला आहे. मुकणे, भाम, भावली, आळंदी अशी छोटी धरणे 100 टक्के भरली आहेत. पावसाचा जोर आणि भरलेली धरणे पाहता अपेक्षेप्रमाणे गोदावरी नदीला या वर्षीचा पहिला पूर आला आहे. गोदाघाट परिसरातील, रामकुंड येथील दुकाने हलविण्यात आली आहेत. नागरिकांना नदीकाठी येऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

एक जण वाहून गेला

पावसाने वालदेवी नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाढेगाव येथील वसंत लक्ष्मण गांगुर्डे (वय 45) हे वाहून गेले आहेत. ते सायंकाळच्या सुमारास पुलावरून जात होते. त्यावेळी ही घटना घडली. या नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. येथून दाढेगाव, पाथर्डी, व पिंपळगाव खांब येथील नागरिकांची ये-जा सुरू असते. नदीचे पाणी वाढल्यास दाढेगावकडे जायचा मार्ग बंद होतो. त्यामुळे येथे नवा पूल उभारावा. तो उंच असावा, अशी मागणी तिन्ही गावातल्या गावकऱ्यांकडून होत आहे.( Chance of heavy rain in Nashik district and Khandesh, Nashik weather, Khandesh weather)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

नाशिक-पुणे आता पावणेदोन तासात, सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुसाट, 64 गावांतील मोजणी पूर्ण

सख्ख्या बहीण-भावाला वाचवण्यासाठी गुरुजींची तापीत उडी; भाऊ वाचला, पण बहीण बुडाली

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.