MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण : चंद्रकांत पाटील

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 4:11 PM

पुणे : राज्यातले ठाकरे सरकार हे दिशाहीन सरकार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी एमपीएससी परीक्षा तसंच मराठा आरक्षणावरून त्यांनी सरकारला प्रश्न विचारले.

“एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही? सरकारमध्ये कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री तर ‘मातोश्री’मध्येच बसलेले असतात”, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.

“मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा असे वडेट्टीवार बोलले असतील तर त्यांना आधी ओबीसी समाजाला विचारावे चालणार आहे. पण असे जर झाले तर गावोगाव संघर्ष होतील. तसंच मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकणे हे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांसाठी चुकीचे ठरेल”, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

“मराठा समाजाला न्याय कधी मिळणार? सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे कधी उठवणार?, अशी प्रश्नांची सरबत्ती करत एक महिना झाला पण हे सरकार काही ही करत नाही हे, सरकार कोविड बाबत गंभीर नाही, शेतकरी प्रश्नाबाबत, महिलावरील अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर नाही विद्यार्थ्याबाबत गंभीर नाही”, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केला.

दुसरीकडे महाराष्ट्रात भाजप लवकरच सत्तेत येईल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांच्या विधानाचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला, असं ते म्हणाले. त्यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता, असं सांगायला देखील चंद्रकांतदादा विसरले नाहीत.

संबंधित बातम्या

सरकार पडेल या अपेक्षेत चंद्रकांत पाटील कपडे घालूनच तयार असतात : शरद पवार

पार्थ आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.