माझी चेष्टा करणं राऊतांच्या अंगावर येणार, चंद्रकांत पाटलांकडून डायरीच्या चौकशीचीही मागणी

आज राजकारणात पुन्हा नवं ट्विस्ट आलंय. कारण यशवंत जाधवांची (Yashwant Jadhav) कथित डायरी चर्चेत आलीय. या डायरीत कुणी कुणाला कसे महागडे गिफ्ट दिले, याचा उल्लेख असल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय.

माझी चेष्टा करणं राऊतांच्या अंगावर येणार, चंद्रकांत पाटलांकडून डायरीच्या चौकशीचीही मागणी
चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला जोरदार टोलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 6:27 PM

मुंबई : शनिवारचा दिवस किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि निलेश राणे यांनी गाजवला. सोमय्यांच्या कोकण दौऱ्याने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. मात्र आज राजकारणात पुन्हा नवं ट्विस्ट आलंय. कारण यशवंत जाधवांची (Yashwant Jadhav) कथित डायरी चर्चेत आलीय. या डायरीत कुणी कुणाला कसे महागडे गिफ्ट दिले, याचा उल्लेख असल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय. तर चंद्रकांत पाटलांनीही (Chandrakant Patil) यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. केंद्रीय यंत्रणा आपलं काम करत आहेत. यात खूप काहीतरी होणार असल्याचं मला दिसतयं, असे सांगत, अशी डायरीत मिळत असेल तर चौकशी व्हावी, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केलीय. माझी राऊतांकडून चेष्टा केली जाते, मात्र जे म्हणतोय ते खरं ठरतयं ठरतं आहे. हीजण सुपात आहेत, काहीजणजात्यात आहेत. तर काही जणांचं पीठ झालं आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है

तसेच सामना वाचणं आणि राऊतांवर बोलणं मी बंद केले आहे. कालचक्र फिरत असतं. कधी आम्ही वर होतो आज कुणीवर आहे , उद्या आम्हीही वर असू, असे सूचक विधानही पाटलांनी केले आहे. तसेच हे घाबरल नाही असे नेते सांगतात , मात्र हे घाबरले आहेत.  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बॅगा भरून ठेवल्यात. किरीट सोमय्या आगे बढो हम तुन्हारे साथ है, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी जो इशारा दिला आहे, त्यावरही चंद्रकांत पाटलांनी भाष्य केले आहे. दादांना मी चिठ्ठी दिली एसटी कर्मचाऱ्यांसंबंधी असेह चंद्रकांत पटालांनी सांगितले आहे.

कोरोनाकाळात महापालिकेला लुटले

यशवंत जाधव यांनी कोविडच्या काळात 24 महिन्यांत 38 मालमत्ता खरेदी केल्या आहेत. कोविड काळात मुंबई महापालिकेला लुटलं आहे. डायरीत नेमकी काय नोंद आहे. हे मी बघीतलेलं नाही. मात्र आयकर विभाग ज्या काही नोंदी आहेत त्यासंदर्भात उचित चौकशी करेल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. नागपुरात विमानतळावर आल्यानंतर फडणवीस बोलत होते. यशवंत जाधव हे माजी नगरसेवक आहेत. ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याबाबत एक डायरी उघडकीस आली आहे. 2018 ते 2022 च्या दरम्यान घडी आणि दोन कोटी रुपयांच्या लेनदेणीचा उल्लेख आहे. या डायरीत 50 लाख रुपयांची घडी आणि दोन कोटी रुपये मातोश्रीला देण्यात आल्यासंदर्भात लिहिण्यात आल्याची माहिती आहे.

Video | कोरोना काळात मुंबई मनपाला लुटलं, Devendra Fadnavis यांचा शिवसेनेवर घणाघात, 24 महिन्यांत 38 मालमत्ता!

Video | मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली; संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका

Chandrapur | आझाद बगीच्याच्या उद्घाटनावरून गोंधळ; आमदार जोरगेवार-सुधीर मुनगंटीवार आमनेसामने

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.