मोठी बातमी : महायुतीतील ‘हा’ आमदार नाराज; म्हणाले, तर मला बोलावूही नका!
Chandrapur Independent MLA Kishore Jorgewar : महायुतीतील आमदाराची नाराजी उघड झाली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना मनातली खदखद बोलून दाखवली. हा आमदार कोण आहे? नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे? नाराजी व्यक्त करताना त्यांनी काय म्हटलं? यासाठी संपूर्ण बातमी वाचा सविस्तर...
निलेश डाहाट , प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी , चंद्रपूर | 4 जानेवारी 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. शिवाय महाराष्ट्रासह अन्य राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशातच आता युती आणि आघाडीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. महायुतीतील नेत्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात बोलायला संधी न दिल्याने चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. जोरगेवार यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना किशोर जोरगेवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. जोरगेवार यांनी उघडपणे आपली नाराजीची चंद्रपूरच्या कृषी महोत्सवात बोलून दाखवली. त्यांच्या या नाराजीची सध्या चर्चा होतेय.
चंद्रपूरमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन कार्यक्रमात स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी दिसली. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत रीतसर नाव असतानाही भाषणासाठी संधी न दिल्याने जोरगेवार संतापले. राज्यातील विद्यमान युती सरकारला आमदार किशोर जोरगेवार यांनी पाठिंबा दिलाय आहे. मात्र कृषी महोत्सवाच्या मंचावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या समक्ष जोरगेवार यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली.
प्रशासनाने या पुढच्या काळात भाषणाची संधी देणार असाल तेव्हाच निमंत्रण पत्रिकेत नाव टाकावं, असं स्पष्टपणे सांगितलं. महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराचा प्रशासन असा अपमान करू शकत नाही अशी भूमिका जोरगेवार मांडली. त्यांच्या या नाराजीची सध्या चर्चा होत आहे.
चंद्रपुरात कृषी महोत्सव कार्यक्रमात स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी स्पष्टपणे पुढे आली. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत रीतसर नाव असतानाही भाषणासाठी संधी न दिल्याने किशोर जोरगेवार हे भडकले. राज्यातील विद्यमान युती सरकारला आमदार किशोर जोरगेवार यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र आता त्यांनी आपली नाराजी बोलू दाखवली आहे.
मात्र कृषी महोत्सवाच्या मंचावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या समक्ष जोरगेवार यांनी प्रशासन आपल्याला कमी लेखत असल्याची मनातली खदखद बोलून दाखवली. भाषणाची संधी देण्यात येणार असेल तरच आपल्याला आमंत्रित करावं, असं किशोर जोरगेवार म्हणाले.