Chandrapur : मारहाण करणं पडलं महागात, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाची मारहाण, गुन्हा दाखल
चंद्रपूरमधील वरोरा शहरामधील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाने मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. स्थानिक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ देता? या कारणावरुन ही मारहाण केली गेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यातील (Chandrapur) वरोरा शहरामधील टोल नाक्यावरील (toll plaza) कर्मचाऱ्यांना शिवसेना (ShivSena) जिल्हाप्रमुखाने मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. स्थानिक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ देता? या कारणावरुन ही मारहाण केली गेली. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर शिवीगाळ, हातबुक्क्याने मारहाण करणे आणि नुकसानीची धमकी देण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. प्रशासनाने दखल देत मनाई आदेश जारी केले होते. मात्र, कायदा हातात घेऊन अशा प्रकारे मारहाण आणि शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा जिल्हाप्रमुखाचा मारहाणीचा व्हिडीओ
VIDEO : Chandrapur | चंद्रपुरात शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून टोलनाक्यावर कर्मचाऱ्याला मारहाण – tv9#Chandrapur #Shivsena #Tollnaka
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/UiW2s7R8Dz
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2022
नेमकं प्रकरण काय
महिनाभरापूर्वी वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ दिले जात असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुखांना दिसून आलं. त्यानंतर स्थानिक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ देता? असा जाब शिवसेना जिल्हाप्रमुखांनी विचारला. यानंतर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारुन मारहाण करण्यात आली.
अखेर गुन्हा दाखल
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरामधील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाने मारहाण केल्याचे प्रकरण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने दखल देत मनाई आदेश जारी केले होते. मात्र, कायदा हातात घेऊन अशा प्रकारे मारहाण आणि शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर शिवीगाळ, हातबुक्क्याने मारहाण करणे आणि नुकसानीची धमकी देण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. स्थानिक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक जाऊ दिले जातात, असं शिवसेना जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ देता, असा जाब त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. त्यामुळे त्यावेळी वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र, अशा प्रकारे मारहाण आणि शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इतर बातम्या