छगन भुजबळ यांना मॉर्निंग वॉकला जाण्यास मनाई, कारण काय?; भुजबळ काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोललो तर मराठा समाज आपल्याला मते देणार नाही, अशी भीती लोकप्रतिनिधींना आहे. त्यामुळे कोणी बोलत नाही. ओबीसी समाजाच्या आमदारांनाही तेच वाटतं. कारण ओबीसींना मराठा समाजाची मते मिळणार नाही अशी भीती आहे. त्यामुळे आमदार मनातलं बोलत नाहीत. पण त्यातही मजबूत असलेले मराठा समाजाचे आमदार त्यांना विरोध करत आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांना मॉर्निंग वॉकला जाण्यास मनाई, कारण काय?; भुजबळ काय म्हणाले?
chhagan bhujbalImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 2:01 PM

विवेक गावंडे, टीव्ही9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर 14 डिसेंबर 2023 : मला गोळी घालून ठार मारण्याची धमकी आली आहे. माझ्या मागेपुढे पोलिसांची फौज आहे. पण तरीही मी मॉर्निंग वॉकला जाणं बंद केलं आहे. मॉर्निंग वॉकला जाऊ नका, असा मला सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. माझ्यावरील केसचा आणि मला आलेल्या धमक्यांचा काय संबंध आहे? मी कशाला खोटं सांगू? कोर्ट काही त्यांच्यासारखा (मनोज जरांगे पाटील) मूर्ख नाहीये. केस केसच्या ठिकाणी आणि बाकीच्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी हे कोर्टालाही माहीत आहे, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मी गेल्या 35 वर्षापासून ओबीसींची लढाई लढत आहे. दिल्लीचं रामलीला मैदान, पटनाचं गांधी मैदान आणि पुण्याच्या एसपी मैदानात प्रचंड मोठ्या रॅली मी काढल्या आहेत. मी ओबीसींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढतोय. आजच ही लढाई सुरू केलेली नाही. हे सर्व जगालाही माहीत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

याचा अर्थ…

भुजबळांच्या कॉलेजजवळ जमा होण्याचे मेसेज फिरत आहेत. याचा अर्थ बीडला झालं तसं करण्याचा प्रयत्न आहे. माझ्यावर फायरिंग केली जाईल असं मला माझ्या लोकांकडून कळलं. सीआयडीकडून पोलिसांना माहिती दिली गेली. मी असल्या गोष्टींना अनेकदा तोंड दिलं आहे. त्यामुळे मी धमक्यांना घाबरत नाही, असं सांगतानाच मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही हे पुन्हा सांगतोय. फक्त ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे, असं भुजबळ म्हणाले.

चुकीच्या पद्धतीने आरक्षण दिलं जात आहे

काल मी मराठा सदस्यांना सभागृहात आरक्षण हवं का विचारलं. अनेकांनी नकारार्थी उत्तर दिलं. अनेक सदस्यांनी मान खाली घातली. मी त्यांना म्हटलं तुम्हाला जर आरक्षण नकोय तर तुम्ही बोललं पाहिजे. मनोज जरांगे सरसकट आरक्षणाची मागणी करत आहेत. अनेक लोक वेगळ्या आरक्षणाची मागणी करत आहेत. सर्व पक्षीय नेते ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. मीही तेच सांगितलं, असं ते म्हणाले. तसेच मराठ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट दिलं जात आहे. चुकीच्या पद्धतीने हे सर्टिफिकेट दिलं जात आहे. तशा नोंदीच मी सभागृहात दाखवल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

तो आरोप बालिश

बीडची दंगल माझ्या पाहुण्यांनी केली असा आरोप केला जात आहे. हा बालिश आरोप आहे. भुजबळ बीडमध्ये जाऊन दंगल करू शकतो का? माझा बीडचा काय संबंध? गेली कित्येक वर्ष मी बीडला गेलो नाही. गेल्या 57 वर्षांपासून मी वेगवेगळी आंदोलने केली. आता माझ्याच लोकांची घरे मी जाळणार का? मी कुणालाही दगड मारला नाही, असं सांगतानाच मनोज जरांगे यांच्यासोबतची माणसं कोण आहेत ते जरा तपासा. त्यांच्या माणसांकडे पिस्तुलं सापडतात. हत्यारे सापडतात. त्यांच्यावरील केसेस पाहा. त्यात किता वाळू माफिया आहेत हे चेक करा. दोन नंबरचे धंदे करणारे किती आहेत हे सर्व आता उघड होत आहे, असा दावा भुजबळ यांनी केला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.