…तर छत्रपतीच्या घराण्याचा वंशज म्हणवून घेणार नाही; संभाजीराजे कडाडले
माझी सगळी भाषणं ऐकली तरी मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. उगाच माझ्या वाक्याचा गैरअर्थ काढू नका, असं सांगतानाच दलित आणि ओबीसींविरुद्ध बोललो असेल तर छत्रपती घराण्याचा वंशज म्हणवून घेणार नाही, अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केलं.
मुंबई: दलित आणि ओबीसींच्या हिताला बाधा येईल अशी माझी कधीच भूमिका नव्हती. माझी सगळी भाषणं ऐकली तरी मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. उगाच माझ्या वाक्याचा गैरअर्थ काढू नका, असं सांगतानाच दलित आणि ओबीसींविरुद्ध बोललो असेल तर छत्रपती घराण्याचा वंशज म्हणवून घेणार नाही, अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केलं. (chhatrapati sambhaji raje clarification on his statement)
‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट केली. दलित आणि ओबीसींचं हित बिघडेल अशी भूमिका मी कधीच घेतली नाही. कोण काय करतंय ते आम्हाला माहीत नाही, असं सांगतानाच मी जे बोललोच नाही, ते विधान माझ्या तोंडी टाकलं जात आहे. दलित, ओबीसींविरुद्ध काही बोललो असेल तर छत्रपती घराण्याचा वंशज म्हणवून घेण्याची माझी पात्रता नसेल, असं संभाजीराजे म्हणाले.
आम्हाला ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं नाही. आम्ही एसईबीसीमधून आरक्षण मागितलं आहे. तो वेगळा प्रवर्ग आहे. ओबीसींचं आरक्षण हे ओबीसींचं आरक्षण आहे. कन्फ्युजन नको. एसईबीसीचं आमचं आहे. जे ईडब्ल्यूएस म्हणत आहेत, ते वेगळं आहे, केंद्राचं आहे. त्यातून जर धोका निर्माण होत असेल तर ते कोण घेणार? त्याबाबत जे भूमिका घेत आहेत, त्यांनी समाजाला लिहून द्यावं, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. आधी व्यवस्थित समन्वय साधला जायचा आता तसं होत नाही. पूर्वी सारखाच सरकारने समन्वय साधायला हवा, अशी आमची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. (chhatrapati sambhaji raje clarification on his statement)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 October 2020 https://t.co/9MGQNDJWUq
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2020
संबंधित बातम्या:
खासदार संभाजीराजेंचा मंत्री विजय वड्डेट्टीवारांविषयी खळबळजनक खुलासा, वड्डेट्टीवारांचा घुमजाव
माझ्या तोंडी नको ते शब्द घालू नका, राजेंचं वेगळं राजकारण असावं : विजय वडेट्टीवार
(chhatrapati sambhaji raje clarification on his statement)