…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार, संभाजीराजे कडाडले

शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असे म्हणत, छत्रपती संभाजीराजेंनी सरकारवर निशाणा साधला. (Chhatrapati Sambhaji Raje targeted government on farmers suicide)

...तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार, संभाजीराजे कडाडले
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 1:40 PM

उस्मानाबाद : राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने काहीतरी ठोस मदत द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्याला सरकार तसेच लोकप्रतिनिधी जबाबदार असतील अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार संभाजीराजेंनी दिली. खासदार संभाजीराजे कालपासून नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. आज संभाजीराजे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी, अपसिंगा गावातील शेती नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. (Chhatrapati Sambhaji Raje targeted government on farmers suicide)

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे वेगवेगळ्या भागांना भेट देत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी गावाला त्यांनी भेट दिली. या गावात कुठे विहिरींचे कठडे तुटले आहेत. तर कुठे तळे फुटले आहे. तसेच फळबागा, सोयाबीन, तूर पूर्णपणे वाहून गेली आहे. या नुकसानीची संभाजीराजे यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला.

“राज्यातील शेतकरी पिचला असून त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना मदत केली नाही तर, शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर लोकप्रतिनिधी तसेच सरकार त्याला जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. उभी पिकं आडवी झाली झाल्याने शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. सोयाबीन, कापूस  पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते नुकसानग्रस्त भागाचा दौरे करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारपासून नुकसान पाहणी दौरा करणार आहेत. पुण्यातील बारामती येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल.

मुख्यमंत्रीही उद्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सोमवारपासून सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.  यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत.

संबंधित बातम्या :

पाहणी नको, तात्काळ मदत द्या…! मंत्री विजय वडेट्टीवारांसमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी

शरद पवारांची बळीराजाशी ‘मन की बात’; गाडी थांबवून ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

बाळासाहेबांचा वारस असल्याचे सिद्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा; विनायक मेटेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

(Chhatrapati Sambhaji Raje targeted government on farmers suicide)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.