खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभांरभ आज पुण्यात करण्यात आला. या वेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर ही टीका केली. ते म्हणाले की महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. पण आता जेव्हा वेळ येईल तेव्हा या सावत्र भावांना जोडा दाखवा.

खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 3:37 PM

पुण्यात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी लाडकी बहीण योजनेचा शुभांरभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्मयंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आज मोठ्या मैदानात लाखो बहिणींना बोलावून हा सोहळा करायचा होता. पण स्टेडियममध्ये घेतला. चार मोठे हॉल आहेत. त्यात लाडक्या बहिणी बसल्या आहेत. हा कार्यक्रम लाइव्ह दिसत आहे. कॅबिनेटमध्ये मी सांगितलं होतं की रक्षा बंधनाच्या आधी हे पैसे पोहोचले पाहिजे. खातं चालतं की नाही हे बघायचं होतं. त्यामुळे एक रुपया टाकायचा सल्ला काहींनी दिला. पण अजितदादा, फडणवीस यांनी सांगितलं तीन हजार टाका आणि ट्रायल रन घ्या. लाडक्या बहिणी सांगत असतात खात्यात पैसे आले. तेव्हापासून राखी बांधायचा कार्यक्रम सुरू झाला. बहिणींच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी नारी शक्ती आल्या आहेत.’

‘मी तुम्हाला वंदनही करतो. कारण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. अनेक बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले. सरकारच्या प्रती भावांच्या प्रती आदर पाहिला. दुसरं काय पाहिजे. तुमच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत हीच प्रामाणिक इच्छा आहे. या योजनेबद्दल सर्वांशी चर्चा झाली. त्याची अंमलबजावणी कशी करायची. आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं हे पाहत होतो. तुम्ही प्रपंच चालवताना कसरत करता, तसं सरकार चालवताना आम्हाला कसरत करावी लागते. पायभूत सुविधांसाठी कर्ज घ्यावं लागतं, पगार असतो, पेन्शन असतं या सर्व गोष्टी करायच्या असतात. पण बहिणींनाही काही तरी द्यायचं होतं. म्हणून ही योजना जाहीर केली.’

‘विरोधक म्हणाले लाडक्या भावाचं काय. यांना कधी तरी लाडक्या भावावर प्रेम होतं का. असतं तर ते सोडून गेले असते का. पण आम्ही लाडक्या भावांनाही शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली. महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला.’

‘मी सर्वांना पुरुन उरलोय. सावत्र कपटी भावांवर मात करून आलो आहे. फक्त त्यांना लक्षात ठेवा. त्यांना योग्यवेळी जागा दाखवा. भीक देता का, विकत घेता का, लाच घेता का असे शब्द काढायला लागले. या बहिणींबद्दल असं बोलताना जनाची नाही तरी मनाची वाटायला हवी होती. ते कोर्टातही गेले. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि बहिणींच्या बाजूने निकाल दिला. खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा.’ अशी टीका ही त्यांनी विरोधकांवर केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.