“मी फिरणारा मुख्यमंत्री, घरात बसून राहणारा नाही”; मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला टोला

मागील अडीच वर्षात ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी घरात बसून कारभार केला, घरात बसून आदेश देण्याचे काम केले. तसं काम मी करणारा नाही अशी शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी बोचरी टीका केली आहे.

मी फिरणारा मुख्यमंत्री, घरात बसून राहणारा नाही; मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला टोला
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 9:01 PM

खेड / रत्नागिरी : आम्हाला गद्दार म्हणता मात्र आम्ही गद्दार नाही तर खुद्दार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज वर्षा बंगल्यावर राज्यातील अनेक प्रेमळ माणसं भेटायला येतात, त्यामुळे त्यांना हाफ चहा पण देऊ शकत नाही. निदान आजच्या या वेळेत मुख्यमंत्री म्हणून आज लोकांना भेटतो तर आहे मात्र मागील अडीच वर्षात जनसामान्यांसाठी वर्षाचा दरवाजा बंदच होता अशी टीकाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेल्या रत्नागिरीतील खेडमधील गोळीबार मैदानावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी काम करणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसून फक्त आदेश देणारा मुख्यमंत्री नाही असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांच्यावर शिवसेनेने केलेल्या राजकारणावरूनही त्यांनी सडकून टीका केली. रामदास कदम यांचे राजकारण संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच त्यांच्यावर राजकारण केल्याचा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवण्याचा घाट राष्ट्रवादी काँग्रेसने घातला असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली. महाविकास आघाडीमुळे शिवसेना संपत गेली आणि त्यांच्यामुळेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वही संपले असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

मागील अडीच वर्षात ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी घरात बसून कारभार केला, घरात बसून आदेश देण्याचे काम केले. तसं काम मी करणारा नाही अशी शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी बोचरी टीका केली आहे.

यावेळी त्यांनी मी घरात बसून राहणारा मुख्यमंत्री नाही तर काम करणारा मुख्यमंत्री आहे असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.