CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला याची खंतच, आनंद नक्कीच नाही; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंकडून उत्तर

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ट्विटरवरुन आपलं अभिनंदन केलं. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजही उद्धव ठाकरे साहेबांबद्दल मला आदर आहे. त्यांनी जो राजीनामा दिला त्यामुळे आम्हाला आनंद झाला असं कुणीही मानण्याचं कारण नाही, असेही शिंदेंनी नमूद केले.

CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला याची खंतच, आनंद नक्कीच नाही; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंकडून उत्तर
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 1:00 AM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. शिंदेंची नाराजी दूर करायला शिवसेनेला यश आले नाही. अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असताना भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. राजीनामा जाहीर करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्यात आलं, अशी खंत (Grief) उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली आहे. यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या मुलाखतीत उत्तर दिले आहे. आम्हालाही याची खंत आहे. आम्हाला कुठे आनंद आहे. पण यात आमची जी भूमिका होती, आपला जो मित्रपक्ष होता, ज्यांच्यासोबत आपण निवडणूक लढवली, आपण त्यांच्यासोबत कामकाज केलं पाहिजे अशी आमची 40-50 आमदारांची भूमिका होती. आम्ही प्रयत्न खूप केले, पण दुर्दैवानं आम्हाला त्यात यश मिळालं नाही. म्हणूनच आजची ही वेळ आली, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ट्विटरवरुन आपलं अभिनंदन केलं. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजही उद्धव ठाकरे साहेबांबद्दल मला आदर आहे. त्यांनी जो राजीनामा दिला त्यामुळे आम्हाला आनंद झाला असं कुणीही मानण्याचं कारण नाही, असेही शिंदेंनी नमूद केले.

बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणून एकजूट दाखवली

गेली 30-40 वर्षे पक्षात काम केलं. 40 आमदार शिवसेनेचे बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे जातात. विकासाचा अजेंडा, मतदारसंघाचे प्रश्न घेऊन पुढे जातात आणि हा निर्णय का घेतात याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. आम्ही इतकी वर्षे पक्षाची सेवा करतो आणि आज हा निर्णय घेतो. काही लोक विरोधातून सत्तेत जातात. पण आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन, त्यांची शिकवण घेऊन जिथे अन्याय होतो, तिथे अन्यायाला वाचा फोडण्याची शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिलीय. वैयक्तिक कुणाचा स्वार्थ नाही, आज आम्ही 40, 50 लोकांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणून एकजूट दाखवली आहे, असे शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आम्ही केवळ पन्नास होतो, भाजपचे 120 आहेत. पण बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यांनी जे समर्थन दिलं हे उदाहरण राज्यात नाही तर देशाला डोळ्यात अंजन घालायला लावणारं आहे. त्यासाठी मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा यांना धन्यवाद दिलेले आहेत. खास करुन मी देवेंद्र फडणवीस यांनाही धन्यवाद देतो. कारण यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज ही परिस्थिती का निर्माण झाली, याच्या मुळाशी जाण्याची, याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले. (Chief Minister Eknath Shinde reaction on Uddhav Thackeray resignation)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.