भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी, अजित पवार यांनाही चिमटे..
भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तूफान फटकेबाजी करत अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांना चिमटे काढले आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री ( Cheif Minister ) पदाच्या बॅनरवरुन राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्याचे पडसादही विधानसभेत दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेत बोलत असतांना त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी सरकारकडून केलेल्या कामाच्या बाबत निवेदन करत असतांना भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये अजित पवार यांनी बॅनर लावण्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तूफान फटकेबाजी केली आहे. त्यावरून सभागृहात एकच हशा पिकला होता.
खरंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आहे. तर विधानसभेचे अध्यक्ष हे राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाकडे आहे. आशातच मुंबईतील पक्ष कार्यालयाच्या बाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून काही नेत्यांचे फलक झळकले होते. त्यावरुन इतर राजकीय नेत्यांनी टीकाही केली होती.
पुणे दौऱ्यावर असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला टोला लगावला होता. भावी मुख्यमंत्री होण्याची स्पर्धा लागली आहे. त्यांनी कायम भावीच राहावं असा टोला लगावला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
जयंत पाटील, अजित पवार तुम्ही आणि इतर लोकांचे बॅनर लागले आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. अजित दादा तुम्हीच सांगितले आहे की साईज सुद्धा एकच आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ठरवून घ्या कुणाचं तरी नंतर फिक्स करून घ्या आपण नंतर बघू त्याचे काय करायचे ते असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षालाच टोला लगावला आहे.
अजित पवार यांची मागणी काय होती ?
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागला. त्यानंतर माझ्या भावी मुख्यमंत्री म्हणून लागला नंतर सुप्रिया सुळे यांचा बॅनर लागला होता. बॅनरची साईज एकच आहे. त्यामुळे त्याची चौकशी करून कारवाई करा. जाऊन बुजून याबाबत प्रयत्न केला जात असल्याची मागणी यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी केली होती.
राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयाच्या बॅनरवरुन मुंबई पोलिसांकडे यापूर्वीही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा अजित पवार यांनीही मागणी केली आहे.