पाकिस्तान झिंदाबादचे नारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारे देणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. तर, घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही असं दम उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुंबई : पुण्यात पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांमुळे राजकारण तापले आहे. अशा घोषणा करणाऱ्या समाजकंटकांची खैर नाही असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इशारा दिला आहे. तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारे देणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. तर, घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही असं दम उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाही असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2022
‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, कारवाई करू ! असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ शेअर करत कारवाईचा इशारा दिला आहे.
'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, कारवाई करू !#pune #Maharashtra #PFI pic.twitter.com/N6ShsCNj8G
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 24, 2022
देशभरातील विविध राज्यांत पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कार्यालयांवर ईडी आणि एनआयएने धाडी टाकल्या. या कारवाईत 106 संशयीतां ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाई दरम्यान एनआयएने पीएफआयशी संबंधित केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आसामसह 11 राज्यांत छापे टाकले. एनआयची ही आज पर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
दहशतवाद्यांना पैसा पुरवणे आणि त्यांना प्रशिक्षण दिल्याचा संशय तपास यंत्रणांना पीएफआय या संघटनेवर होता. यामुळेच थेट धाडसत्र राबण्यात आले आहे.