मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर, सिंचन प्रकल्पांची पाहणी करणार
गोसेखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी 2 हजार कोरी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचं पाटंबधारे विभाकडून सांगण्यात आलं होतं.
नागपूर: कोरोना काळात मातोश्री आणि वर्षा निवासस्थानावरुन राज्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना ते भेट देतील. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचं नागपुरात आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने गोसेखुर्द धरणाकडे रवाना होणार आहेत. (CM Uddhav Thackeray will inspect irrigation projects in East Vidarbha)
गोसेखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी 2 हजार कोरी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचं पाटंबधारे विभाकडून सांगण्यात आलं होतं. जुलैमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यावेळी प्रकल्पाच्या पुनर्वसनाला गती देण्याची सूचना केदार यांनी दिली होती.
गोसेखुर्द धरणाची क्षमता
गोसेखुर्द प्रकल्पाची सुधारीत प्रशासकीय मान्यता 18 हजार 494 कोटी रुपयांची आहे. प्रकल्पाची एकूण क्षमता 1146 दलघमी आहे. तर सिंचन क्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्टर आहे. गोसेखुर्द धरणावर खासगीकरणांतर्गत 2 विद्यूत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून कोकणातील प्रकल्पांचीही पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 डिसेंबर रोजी सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याचा दौैरा केला. रत्नागिरी इथं दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोफळी प्रकल्पाची पाहणी केली. पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अनिल परब, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील फोपळी, (चिपळूण) येथील कोयनेच्या चौथ्या टप्प्यातील जलविद्युत केंद्राची पाहणी केली. pic.twitter.com/YaPWVcK8KP
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 10, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 10 डिसेंबरला सकाळी १० च्या सुमारास कोयनानगर हेलीपॅडवर दाखल झाले. त्यानंतर मोटारीने ते पोफळी जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेले. त्यानंतर त्यांनी पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा – 4 ची पाहणी केली. उद्धव ठाकरे हे कोळकेवाडी टप्पा 4 ला भेट देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. तयावेळी पोफळी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पोफळी जलविद्युत प्रकल्पाची पाहणी
ठाकरे मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार
CM Uddhav Thackeray will inspect irrigation projects in East Vidarbha