cm uddhav thackeray: मुख्यमंत्री म्हणाले, दादा, तुमच्याकडे येण्याची गरज नाही, अजितदादा म्हणतात, हा भेदभाव बरा नाही

जीएसटी भवनाच्या (gst bhavan) भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यात शाब्दिक कोटी झाल्याचं पाहायला मिळालं.

cm uddhav thackeray: मुख्यमंत्री म्हणाले, दादा, तुमच्याकडे येण्याची गरज नाही, अजितदादा म्हणतात, हा भेदभाव बरा नाही
मुख्यमंत्री म्हणाले, दादा, तुमच्याकडे येण्याची गरज नाही, अजितदादा म्हणतात, हा भेदभाव बरा नाहीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 7:35 PM

मुंबई: जीएसटी भवनाच्या (gst bhavan) भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यात शाब्दिक कोटी झाल्याचं पाहायला मिळालं. दादा, तुम्ही जिथे आहात, तिथे मला येण्याची गरज नाही असं मला वाटतं. कारण आपण एकत्रं काम करतो आणि आपण सर्व मजबूत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तर, शिवसेनेकडे खाते असलेल्या मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाता आणि आमच्या खात्याच्या कार्यक्रमाला तुम्ही येत नाही. मुख्यमंत्री महोदय हा भेदभाव बरोबर नाही. आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हीच काय ते उत्तर द्या, असं अजित पवार म्हणाले. त्यावेळी एकच खसखस पिकली. जीएसटी भवनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित होते. तर मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री स्वत: हजर झाले होते. हाच धागा पकडून अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मिष्किल टोलेबाजी रंगली.

दादा मी स्वत: असा विचार करतो जिथे तुम्ही स्वत: आहात तिथे मी पुन्हा याची गरज नाही. आपण एकत्रित काम करतो. आपल्यात एकवाक्यता आहे. आपण सर्व मजबूत आहोत आणि महाविकास आघाडीचं सरकार मजबूत करत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आता तुम्हीच काय ते खरं सांगा

हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोटी केली. मुख्यमंत्री मला म्हणाले होते की, मी स्वत: या कार्यक्रमाला येईल. आता मुख्यमंत्री महोदय थोडा भेदभाव होतोय. आमचं डिपार्टमेंट आहे तिथं तुम्ही भूमिपूजनाला येत नाही. मराठी भाषा भवनला मात्र भूमिपूजनाला स्वत: येता. त्यामुळे पेपरला सारख्या बातम्या येतात, परिणामी सारखं अंतर वाढतं. मुख्यमंत्री राष्ट्रवादीकडे असलेल्या डिपार्टमेंटच्या कार्यक्रमाला आले नाही. शिवसेनेकडील मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला मात्र आले. हे कसं? असं विचारलं जातं. आता गुढी पाडव्याच्या दिवशी त्याचं तुम्हीच काय ते खरं सांगा, असं अजितदादा म्हणाले.

करदात्याला प्रसन्न वाटलं पाहिजे

करदाता या इमारतीत आल्यावर त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. आपण देत असलेल्या कराचा राज्याच्या विकासाला योग्य उपयोग होत आहे याचा आनंद त्याला इथं आल्यावर वाटला पाहिजे. यादृष्टीने आपण सर्वोत्तम काम कराल यात शंका नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महत्वाचे. कामाच्या प्रशिक्षणाबरोबर जनतेशी कसं वागावं आणि येणारा माणूस हसतमुखाने परत गेला पाहिजे याकडेही लक्ष द्यावे. पर्यावरणपूरक इमारतीचे हे बांधकाम आजच्या शुभमुर्हूतावर होत आहे. आम्ही सगळेजण एकजुटीने काम करत आहोत. हे सांगणारी ही विकास कामे आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या:

हर्षवर्धन पाटील भाजपचे बारामती लोकसभेचे संभाव्य उमेदवार? आतापासूनच पाटलांचे पंख छाटण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न, इंदापूरमध्ये काय घडतंय?

Mumbai Metro 2A, metro 7 : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रो प्रवास, पाहा तुमच्या नव्या मेट्रोचे चकाचक फोटो

Raj Thackeray LIVE : मनसेची भव्य बाईक रॅली सुरू, थोडच्याच वेळात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.