Maharashtra Lockdown Updates : सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे.
मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजपासून राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही हा निर्णय जनतेने घ्यावा, असंही नमूद केलं. लॉकडाऊन करायचा नसेल तर मास्क वापरा आणि नियम पाळा. अन्यथा 8 दिवसानंतर लॉकडाऊनवर निर्णय घ्यावा लागेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं (CM Uddhav Thackeray ban on Festivals religious program protest in Maharashtra amid Corona).
उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. जिथं गरज असेल तिथं बंधनं घालणं किंवा लॉकडाऊन जाहीर करण्याच्या सूचना स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. अमरावती, यवतमाळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. त्यानंतर तिथं लॉकडाऊन करायचा असेल तर अधिकाऱ्यांनी अचानक घोषणा न करता जनतेला 24 तास द्यावेत.”
CM Uddhav Thackeray Live : “उद्यापासून मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर बंदी, पक्ष वाढवू, पण कोरोना नाही, पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू” @CMOMaharashtra @OfficeofUT pic.twitter.com/uAg1Inmsb7
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
“7 वाजता पत्रकार परिषद घेऊन अचानक मध्यरात्रीपासून लॉकडाऊन असं करणार नाही”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचानक लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णयावरही निशाणा साधला. “मी 7 वाजता पत्रकार परिषद करुन आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू असं काही करणार नाही. अचानक घोषीत केलेला लॉकडाऊन हा घातक आहे. त्यामुळेच उद्या रात्रीपासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा तशा स्वरुपाची काही कडक बंधनं लादली जाऊ शकतात. विशेषत: विदर्भात जिथं स्थिती गंभीर आहे. बाकी राज्यासाठी 8 दिवसांचा कालावधी असेल. या काळात राज्यातील स्थिती कशी असेल यावरच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल.
महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? 8 दिवसांचा अल्टिमेटम
हा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला थेट विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी रात्री सात वाजता संवाद साधला त्यावेळेस त्यांनी हा सवाल केला आहे. लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुढचे आठ दिवस त्यासाठी महत्वाचे असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सुचित केलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही याचा निर्णय पुढच्या आठ दिवसात होऊ शकतो. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील असं मुख्ममंत्री म्हणालेत.
हेही वाचा :
Maharashtra Lockdown Updates : …तर आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल : मुख्यमंत्री
कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढला, नाशिकमध्ये संचारबंदी लागू, छगन भुजबळांकडून घोषणा
व्हिडीओ पाहा :
CM Uddhav Thackeray ban on Festivals religious program protest in Maharashtra amid Corona