'हा धृतराष्ट्र नाही, महाराष्ट्र आहे!' Cm Uddhav Thackeray यांची विधानसभेत फटकेबाजी

‘हा धृतराष्ट्र नाही, महाराष्ट्र आहे!’ Cm Uddhav Thackeray यांची विधानसभेत फटकेबाजी

| Updated on: Mar 25, 2022 | 5:54 PM

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत (Vidhansabha) कोव्हिड घोटाळ्याच्या आरोपापासून ते नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यापर्यंत रोखठोक भूमिका मांडली.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत (Vidhansabha) कोविड घोटाळ्याच्या आरोपापासून ते नवाब मलिकांच्या (Nawab Malik) राजीनाम्याच्या मुद्द्यापर्यंत रोखठोक भूमिका मांडली. त्याचवेळी विरोधकांना जोरदार फटकारेही लगावले. मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर झालेल्या प्रत्येक आरोपांवर उत्तरे दिली. सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि देशमुखांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही? आम्ही तुमच्या गळ्यात पट्टा बांधला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहात ही निच, विकृत आणि निंदणीय गोष्ट आहे. मर्द असेल तर अंगावर ये, बघतो तू आहे आणि मी आहे. आता कळत नाही शिखंडी कोण आणि मर्द कोण. याला मर्दपणा म्हणत नाही. घराघरातील कुटुंबाला बदनाम करायचा. धाडी टाकायचा. मागे गडकरी म्हणाले, आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. तुमच्याकडे ह्यूमन लॉन्ड्रिंग सुरू केलंय का? म्हैसूर साबण लावायचा, बघा झाला स्वच्छ. हा धृतराष्ट्र नाही, तर महाराष्ट्र आहे, असेही ते म्हणाले.

Published on: Mar 25, 2022 05:52 PM