उद्यापासून विदर्भातल्या काही जिल्ह्यात लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

विदर्भात कोरोनाचा स्फोट झाला आहे. विदर्भाच्या जिल्ह्यांमधील कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड वाढला आहे (CM Uddhav Thackeray instruction to Collectors about Lockdown)

उद्यापासून विदर्भातल्या काही जिल्ह्यात लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 8:47 PM

मुंबई : विदर्भात कोरोनाचा स्फोट झाला आहे. विदर्भाच्या जिल्ह्यांमधील कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्याची माहिती दिली (CM Uddhav Thackeray instruction to Collectors about Lockdown).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्हाधिकाऱ्यांना नेमकी सूचना काय?

“अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या पठ्ठ्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे उद्यापासून तिथे बंधनं घालत आहोत. अचानक लॉकडाऊन करणं घातक आहे. त्यामुळे तिथल्या जनतेला एक दिवस द्या. त्यानंतर रात्री आठ वाजेपासून बंधनं सुरु करा, असं अधिकाऱ्यांना सांगितलं आहे”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये नेमकी परिस्थिती काय?

1) अमरावतीत लॉकडाऊन जाहीर

विदर्भातील अमरावती या जिल्ह्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. अमरावतीत दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अमरावतीत आज दिवसभरात तब्बल 709 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. दररोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आठवडाभर लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावतीत सोमवारी (22 फेब्रुवारी) रात्री आठ वाजेपासून पुढच्या सात दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन अमरावती शहर आणि अचलपूर शहरात असणार आहे. या लॉकडाऊन काळात नागरिकांना फक्त जीवनाश्यक वस्तू खरेदासाठी मूभा असेल. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं नाही तर संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली (CM Uddhav Thackeray instruction to Collectors about Lockdown).

अमरावतीतबाबत मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त

“आज अमरावतीत हजाराच्या आसपास रुग्ण सापडले आहेत. ही परिस्थिती वाईट आहे. आज आपण दिरंगाई किंवा गलथानपणा केला तर भविष्यातील परिस्थिती काय असेल त्याची मला चिंता आहे. रुग्ण संख्या वाढली तर आरोग्य यंत्रणेवर ताण येईल”, अशी चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

2) अकोला जिल्ह्यात 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन

अकोला जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. अकोल्यात आज दिवसभरात 222 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अकोल्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता थेट 13869 वर पोहोचला आहे. यापैकी 11496 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 2020 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अकोल्यात गेल्या आठवड्यापासून नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यानुसार अकोल्यातील अकोला, मुर्तीजापुर आणि अकोट या परिसरात कडक लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, भाजी विक्रेत्यांना पहाटे 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर लग्नासाठी फक्त 25 जनांना परवानगी असणार आहे.

3) वर्ध्यात कडक संचारबंदी, दुकानेही बंद

वर्ध्यात कडक संचारबंदी सुरू आहे. नागरिकांनीही संचारबंदीला उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र काही ठिकाणी संचारबंदीचा प्रवाशांना फटका बसलेला दिसत आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेक प्रवाशांना एसटी स्थानकातच ताटकळत राहावे लागले आहे. रेल्वेने वर्ध्यात आलेल्या प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून ते उद्या सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्यमुळे वर्ध्यातील नागरिक चांगदलेच घाबरले आहेत. त्यामुळे दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद केली आहेत. औषधांची दुकाने वगळता वर्ध्यात सर्वच अस्थापना बंद असल्याने शहरात शुकशुकाट निर्माण झाला आहे.

4) नागपूर अलर्टवर

नागपूरमध्ये कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ठाकरे यांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहनच नागरिकांना केलं आहे. तसेच अनिर्बंधपणे वागणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देतानाच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सक्त असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत नागरिकांकडून तब्बल 1 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील सर्व मंगल कार्यालये, रिसॉर्ट आणि लॉन्सवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरू नये म्हणून उद्या सोमवारपासून ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

नागपूरमधील गेल्या चार दिवसातील कोरोना अपडेट :

18 फेब्रुवारी – 644 19 फेब्रुवारी – 754 20 फेब्रुवारी – 725 21 फेब्रुवारी – 626

5) यवतमाळवरमध्ये नव्याने निर्बंध लागू

यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्याने जिल्हाधिकारी ही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी माहिती दिली. कोरोनाचं संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाचा कोव्हिड-19 ची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोविड 19 रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्थानिक बसस्थानक चौकात जिल्हाधिकार्‍यांनी थांबत नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच विनामास्क फिरणार्‍यांना दंडही केला. तसंच यापुढेही रुग्ण वाढू नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावं, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

6) राज्यातील दिग्गज नेत्यांना कोरोना, यामध्ये विदर्भाच्या नेत्याचाही समावेश

राज्यातील दिग्गज नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विदर्भाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशाशन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय मंत्री यशोमती ठाकूर या देखील आजारी होत्या. पण त्यांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

“माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी डॉ. राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली. जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. यशोमती ठाकूर यांना दोन-तीन दिवसांपूर्वी बरं नव्हतं. त्या आजारी होत्या. पण सुदैवाने त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.