Maharashtra lockdown All party meet Highlights : राज्यात 8 किंवा 14 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्री म्हणाले, दुसरा पर्याय नाही!

| Updated on: Apr 10, 2021 | 8:03 PM

Maharashtra Lockdown update : कोरोनाचा उद्रेक रोखून साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय बैठक (Maharashtra all party meeting) बोलावली होती.

Maharashtra lockdown All party meet Highlights : राज्यात 8 किंवा 14 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्री म्हणाले, दुसरा पर्याय नाही!
All Party meeting

मुंबई : कोरोनाचा उद्रेक रोखून साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा पर्याय नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय बैठक (Maharashtra all party meeting) बोलावली होती.  महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात (Maharashtra lockdown) तब्बल सव्वा दोन तास खलबतं या बैठकीत झाली.

“लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय सर्वांच्या सूचना ऐकल्या, चांगल्या आहेत. पण निर्बंध आणि सूट दोन्ही एकाचवेळी शक्य नाही. येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आवरावं, सतत केंद्राकडे बोट दाखवाल, तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका, असं रोखठोक मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ऑनलाईन झालेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.  संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली, ती जवळपास सव्वा सात वाजेपर्यंत चालली.

लॉक डाऊनची वेळ आली आहे दुसरा कोणता पर्याय नाही, असं  मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्याचे आदेश. पुढच्या दोन दिवसात निर्णय होईल. 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन असू शकतो. वैद्यकीय सचिव तात्याराव लहाने आणि आरोग्य सचिव यांची 14 दिवस लॉकडाऊनची मागणी आहे. काँग्रेसची मागणीही लॉकडाऊन 14 दिवस असावा. तर सरकार नेमकं काय करणार याचा सविस्तर प्लॅन तयार करावा, अशी भाजपची भूमिका आहे.

VIDEO : मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय घडलं? 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Apr 2021 07:43 PM (IST)

    तात्याराव लहाणेंचं काय जातंय? आमदारांचे 2 कोटी कापा, 700 कोटी मिळतील : चंद्रकांत पाटील

    बैठकीत सगळ्यात शेवटी निर्णय काही झाला नाही, पण मुख्यमंत्र्यांची भूमिका कडक लॉकडाऊनची आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांना काय मदत करता येईल ही माझी मागणी अजित पवार यांनी मान्य केली. सोमवारी याबाबत अजित पवार निर्णय घेऊ असं म्हणतात. त्यांनी गरीब नागरिकांना एखादं पॅकेज जाहीर केलं पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांचा विचार केल्याशिवाय कोणता निर्णय घेऊ नये.

    दोन दिवसात मुख्यमंत्री विचार घेऊन निर्णय घेतील अशी अपेक्षा. घरी बसवून शिवथाळीचे पॅकेट पाठवून देणार का घरात? पैसे नाही म्हणता आणि आमदारांना 2 कोटी कसे देता? एका वेळी 700 कोटी वापरायला मिळतील. 14 दिवसाचा कडकडीत लॉक डाऊन लावा म्हणणाऱ्या तात्याराव लहाणे यांचे काय जाताय. त्यांनी झोपडपट्टी मध्ये जाऊन गरिबांची अवस्था पहा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • 10 Apr 2021 07:31 PM (IST)

    Maharashtra lockdown update Uddhav Thackeray Live : दोन दिवसात निर्णय घेऊ : मुख्यमंत्री

    सर्व सूचना ऐकल्या आहेत. दोन दिवसात निर्णय घेऊ. सर्वांनी सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर निर्णय घेण्याआधी प्लॅन तयार करावा, असं देवेंद्र  फडणवीस यांनी सांगितलं.

  • 10 Apr 2021 07:22 PM (IST)

    Nana Patole live – भाजपने राजकारण थांबवावं – नाना पटोले

    आम्ही लॉकडाऊनची भूमिका घेतली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक, मात्र विरोधक अजूनही राजकारण करत आहे. आधी मदत मग लॉकडाऊन असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण सध्या जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्याची राज्यात परिस्थिती बिकट आहे. भयानक स्थितीला सामोरं जावं लागत आहे. आता ताटं आणि दीवे पेटवण्याची वेळ नाही. केंद्राने राष्ट्रीय महामारी घोषित केलीय. गुजरात हायकोर्टाने त्या सरकारला फटकारलं. पण महाराष्ट्रात राजकारण होत आहे. मदतीचा प्रश्न आहे, त्याला काँग्रेसचं समर्थन आहे. 20 लाख कोटींचा रुपया कुणाला मिळाला नाही. राज्याने विशेष पॅकेज तयार करावं. आम्ही केंद्राकडे बोट दाखवत नाही. मदतीची भूमिका राज्याची आहे. केंद्राने सर्वात मोठं पाप केलं, लसीकरणात भाजपविरोधी राज्यांना कमी लस दिली. रोज जवळपास ६ लाख लसीकरणाचं टार्गेट होतं. पण लसी अत्यल्प पुरवल्या. त्यावर आरोप केला राज्याने लसी खराब केल्या. उत्तर प्रदेशात ९ टक्के वेस्ट, महाराष्ट्रात ३ टक्के वेस्ट झाल्या. केवळ राजकारण सुरु आहे – नाना पटोले

  • 10 Apr 2021 07:17 PM (IST)

    MNS opposes Maharashtra lockdown : मनसेचा लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधांना विरोध

    लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध यांना मनसेचा विरोध आहे ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या रुग्णालयात आहेत. मात्र मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पक्षामार्फत ही भूमिका जाहीर केली

  • 10 Apr 2021 07:09 PM (IST)

    Maharashtra lockdown update Uddhav Thackeray Live : गैरसमज पसरवणाऱ्यांशी चर्चा काय करायची? : उद्धव ठाकरे

    कोरोना हा रोगच नाही असा गैरसमज पसरवणारे आहेत, अशा लोकांशी काय चर्चा करायची?  कोरोनाचा गुणाकार थांबवला पाहिजे. ताबडतोबीने पावलं टाकली पाहिजेत. किती आरोग्य सुविधा वाढवू शकू याचा विचार झाला पाहिजे , असं मुख्यमंत्री म्हणाले.

    दोन डोस घेऊन सुद्धा अजून माझ्या शरिरात अँटी बॉडी तयार झाल्या नाहीत

    आज काही तरी निर्णय घेण्याची आवश्यकता – मुख्यमंत्री

  • 10 Apr 2021 07:04 PM (IST)

    CM Uddhav Thackeray Live Maharashtra lockdown update : तज्ज्ञांच्या मते 14 दिवस लॉकडाऊन आवश्यक : मुख्यमंत्री

    14 दिवसांचं लॉकडाऊन असावं असं तज्ज्ञांचं मत आहे. मुख्यमंत्री या मताशी सहमत आहे. कोरोनाचा गुणाकार थांबवला पाहिजे. ताबडतोबीने पावलं टाकली पाहिजेत. किती आरोग्य सुविधा वाढवू शकू याचा विचार झाला पाहिजे , असं मुख्यमंत्री म्हणाले.

  • 10 Apr 2021 06:52 PM (IST)

    Maharashtra lockdown update Uddhav Thackeray Live : कडक निर्बंध लावू, 8 दिवसांनी एक एक गोष्ट सुरु करु : मुख्यमंत्री

    चांगल्या सूचना आल्या आहेत मी त्याची नोंद घेतली आहे. कडक निर्बंध हवेत आणि सूटही पाहिजे हे दोन्ही गोष्ट एकत्र शक्य नाही. आता तरी आपल्याला कडक निर्बंध करुन थोडी कळ सोसावी लागेल

    व्यापऱ्यांशी मी बोललो. होम डिलिव्हरी , टेक अवेला दोन तीन दिवस लागतील. सुरुवातीला कडक निर्बंध लावू. 8 दिवसांनी एक एक गोष्ट सुरू करू. रेमडीसीव्हिर नेहमी लागणार औषध नाही म्हणून ते परदेशातून चायनामधून रॉ मटेरियल लागतो. म्हणजे रेमडीसीविरच्या उत्पादनावर मर्यादा येतायत.  कडक निर्बंध लाऊ , 8 दिवस लाऊडाऊन हा सध्या मार्ग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

    जो नवीन स्ट्रेन आहे तो व्हॅक्सिननेही थोपवला जात नाहीये, कडक निर्बंधाशिवाय पर्याय नाही

  • 10 Apr 2021 06:39 PM (IST)

    Maharashtra lockdown all party meeting Ajit Pawar Live : मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, आमचा पाठिंबा : अजित पवार

    अजित पवार म्हणाले, सर्वांचं ऐकूण जो निर्णय घ्याचा आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा आमचं सहकार्य असेल

    ऑक्सिजन संदर्भात नियमावली केली पाहिजे. रेमडीसीविरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. काही ठिकाणी एम बी बी एस डॉक्टरचं मानधन कमी आहे. काळाबाजार थांबवायला आपण यशस्वी झालं पाहिजे. पुणे शहरात, पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात एक आठवडा राज्यासाठी जो निर्णय घेतला जाईल तो लागू करू नये, तो स्थानिक प्रशासनच्या स्तरावर निर्णय घेऊ. गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेऊ. माझं व्यक्तीगत मत आहे गरिब वर्गाला त्यांना मदत देण्याची आहे

  • 10 Apr 2021 06:38 PM (IST)

    Maharashtra lockdown all party meeting Eknath Shinde Live : लोकांना थोडा अवधी देऊ आणि कडक निर्बंध लावू – एकनाथ शिंदे

    लोकांची जीव वाचवणे आपली प्राथमिकत आहे. विकेन्ड लॉकडाऊन केले आहे. अर्थचक्र पण सुरु ठेवायचे आहे. आपण सर्वांना निर्णय घायचे आहेत. आता लोकांचे जीव वाचवणे गरजेचे आहे. प्रवीण दरेकर यांनी घर पोच डीलवरीचा मुद्दा मांडला. आता एक व्यवक्ती 10 पेक्षा जास्त लोकांना संक्रमित करतो आहे. लोकांना थोडा अवधी देऊ आणि कडक निर्बंध लाऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले

  • 10 Apr 2021 06:32 PM (IST)

    Maharashtra lockdown all party meeting Chandrakant Patil Live : आमदारांचा निधी कमी करा, कामगारांना द्या : चंद्रकांत पाटील

    चंद्रकांत पाटील – आमदारांचा विकासनिधी 2 कोटीने कमी करावा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्यावे. कठोर निर्बंध आणि जगणं यात समन्वय साधला गेला पाहिजे

    एकनाथ शिंदे – मीरा भाईंदर परिसरात फक्त चार दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा

  • 10 Apr 2021 06:28 PM (IST)

    Maharashtra lockdown all party meeting Sitaram Kunte Live : आता 100 टक्के ऑक्सिजन कोविडसाठी

    सीताराम कुंटे लाईव्ह – आता 100 टक्के ऑक्सिजन कोविडसाठी लागणार आहे. तसे आदेशही लवकरच काढले जातील. राज्याची दर दिवसाची उत्पादन क्षमता 1200 मेट्रिक टन एवढी आहे. आज कोविडसाठी 960 मेट्रिक टनची मागणी आली. 85 टक्के राखीव मर्यादाच्या ही पुढे गेली आहे

  • 10 Apr 2021 06:21 PM (IST)

    Pravin Darekar Live : आता उणी दुणी नको, एकमेकांच्या विचाराने पुढे जाऊ : प्रवीण दरेकर

    काँग्रेसमध्ये एकमत नाहीत. नाना पटोले यांचे मुंबईत होर्डिंगज लावले जात आहेत. त्यामध्ये लॉकडाऊन चालणार नाही, असं म्हटलं जातंय. इथेच बाळासाहेब थोरात म्हणत आहेत, कडक आणि कटू निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकमत नाही. उद्योग, व्यवसायिक, हातावर पोट असणाऱ्यांची व्यवस्था करा.

    मानसिक दिलासा एकमेकांना देण्याची गरज आहे. समन्वय आवश्यक. एकमेकांची उणी दुणी निघत असतात. पण आपण एकमेकांच्या विचाराने पुढे जाऊ – प्रवीण दरेकर

  • 10 Apr 2021 06:15 PM (IST)

    Maharashtra lockdown all party meeting Pravin Darekar Live : आपण एकमेकांच्या विचाराने पुढे जाऊ – प्रवीण दरेकर

    ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था शासन करत असेल तर ती आकडेवारी द्यावी, व्यापरी उद्योग जगतात प्रचंड अस्वस्थता आहे. नाना पटोलेंचे मुंबईमध्ये होर्डिंग लावल्या जातात. लॉकडाऊन चालणार नाही आणि इथे बाळासाहेब थोरात म्हणतात की कटू निर्णय घ्यावे लागतील म्हणून आपल्यात ही एक वाक्यता असण्याची गरज आहे. उद्योग व्यवसायिक, हातावर पोट असणाऱ्यांची व्यवस्था करण्याची गरज आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

    दुकान ते घर वस्तू पोहोचवण्यासाठी व्यवस्था उभी करावी, खासगी संस्थांची मदत घ्यावी, व्यापरी, छोटे उद्योजकांचा धंदा पण होईल आणि ग्राहकांपर्यत माल पोहचेल – प्रवीण दरेकर

    काँग्रेसमध्ये एकमत नाहीत. नाना पटोले यांचे मुंबईत होर्डिंगज लावले जात आहेत. त्यामध्ये लॉकडाऊन चालणार नाही, असं म्हटलं जातंय. इथेच बाळासाहेब थोरात म्हणत आहेत, कडक आणि कटू निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकमत नाही. उद्योग, व्यवसायिक, हातावर पोट असणाऱ्यांची व्यवस्था करा.

    मानसिक दिलासा एकमेकांना देण्याची गरज आहे. समन्वय आवश्यक. एकमेकांची उणी दुणी निघत असतात. पण आपण एकमेकांच्या विचाराने पुढे जाऊ – प्रवीण दरेकर

  • 10 Apr 2021 06:13 PM (IST)

    Maharashtra lockdown all party meeting Rajesh Tope Live : मी काय फार मोठा माणूस नाही, राजकारण थांबवा : टोपे हळहळले

    व्हॅकसीन 6 लाख एक दिवसाला आणि 40 लाख एका आठवड्यात हवे आहे आणि महिन्याला एक कोटी लागणार आहे. या विषयात कुणालाही राजकारण करायचं नाहीये. 25 वर्षापासून आपण ओळखतो. मी काय फार मोठा माणूस नाही. संक्रमण वेगाने पसरतंय. विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा मदत करावी. व्हॅक्सिन मिळावं, आयसीयू, आणि व्हेंटिलेटर मुंबई आणि पुणे येथे वाढवण्याची गरज आहे. ऑक्सिजनची कमतरता भारत सरकारला सांगून दूर करावी, असं राजेश टोपे म्हणाले.

  • 10 Apr 2021 06:00 PM (IST)

    Maharashtra lockdown update Rajesh Tope live : मुंबई , पुणे सारख्या शहरात ट्रेसिंग करणे कठीण – राजेश टोपे

    व्हॅकसीन 6 लाख एक दिवसाला आणि 40 लाख एका आठवड्यात हवे आहे आणि महिन्याला एक कोटी लागणार आहे. या विषयात कुणालाही राजकारण करायचं नाहीये. 25 वर्षापासून आपण ओळखतो. मी काय फार मोठा माणूस नाही. संक्रमण वेगाने पसरतंय. विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा मदत करावी. व्हॅक्सिन मिळावं, आयसीयू, आणि व्हेंटिलेटर मुंबई आणि पुणे येथे वाढवण्याची गरज आहे. ऑक्सिजनची कमतरता भारत सरकारला सांगून दूर करावी, असं राजेश टोपे म्हणाले.

    राजेश टोपे – 50 हजार रेमडीसीविरची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या दिवसात 1 लाखाहून ही जास्त लागतील

    प्रत्येक खासगी रुग्णालयात रेमडीसीविर कुणाला देतायत याची तपासणी केली जाणार आहे. रेमडीसीविर देणाऱ्या रुग्णांची वर्गवारी केली पाहिजे. कोविड खासगी रुग्णालयात जिल्हाधिकारींनी नियंत्रण ठेवावं जेणेकरुन रेमडेसीवरच्या उपयोगावर नियंत्रण येईल

    रेमडेसीविरचा एक्स्पोर्ट थांबवला पाहिजे

    ट्रेसिंग करणे खूप अवघड आहे मुंबई , पुणे सारख्या शहरात ट्रेसिंग करणे कठीण आहे

  • 10 Apr 2021 05:56 PM (IST)

    Maharashtra lockdown update Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅडमिट

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. राज ठाकरे यांच्या हातावर शस्त्रक्रिया होत आहे., त्यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत. त्यामुळेच आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत.

  • 10 Apr 2021 05:47 PM (IST)

    Maharashtra lockdown update Ashok Chavan Live : लॉकडाऊन नको, मध्यबिंदू काढा : अशोक चव्हाण

    अशोक चव्हाण म्हणाले, आव्हानात्मक परिस्थिती आपल्याकडे आहे. लॉकडाऊन किंवा निर्बंध लावायचे असतील तर गरिबांचंही नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊनही नको आणि सर्व सुरु नको, मध्यबिंदू साध्य करायला हवा

    आपल्या राज्यात टेस्टिंग वाढवली आहे त्यामुळे आपल्याकडे रुग्णाची संख्या जास्त दिसत आहे. ही वस्तुस्थिती आहे. टेस्टिंग वाढवलं म्हणून संख्या वाढली इतर ठिकाणी असं होतं नाहीये. पण आपण आकडे लपवत नाही हेही सत्य आहे

    राज्य आणि केंद्र सरकारने समन्वयाने परिस्थिती हाताळावी. Lock down करायचा असेल तर त्याची पूर्वसूचना लोकांना द्यायला हवी.

  • 10 Apr 2021 05:45 PM (IST)

    Maharashtra lockdown update Balasaheb Thorat Live – कटू निर्णयाची अंमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल

    कटू निर्णयाची अमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल. मृत्यू थांबणं यासाठी सर्वोत्तम उपाय करा.  कटू निर्णय घ्यावा लागला तरी तो स्वीकारावा लागेल. कटू निर्णयाची अमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

    गुजरातमधून रेमडेसीवरचा साठा मिळू शकला तर पाहावे. इथे बैठकीला फडणवीस साहेब उपस्थित आहेत, असंही थोरात म्हणाले

  • 10 Apr 2021 05:42 PM (IST)

    Maharashtra lockdown update Nana Patole Live : लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य – नाना पटोले

    आजची जी स्थिती आहे लोकांचा जीव वाचवण्याला आपली प्राथमिक राहिली पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले.

    बाळासाहेब थोरात म्हणाले, सर्वांकडची परिस्थिती बिकट होत चालली आहे. जो सर्वोत्तम उपाय असेल तो आपण घेतला पाहिजे –

    ज्यांचं हातावरच पोट आहे त्यांचा विचार केला पाहिजे । मृत्यू थांबणं यासाठी सर्वोत्तम उपाय करा. कटू निर्णय घ्यावा लागला तरी तो स्वीकारावा लागेल.

  • 10 Apr 2021 05:39 PM (IST)

    Devendra Fadnavis Live : मंत्र्यांना सांगा, अन्यथा आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका : फडणवीस

    पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल.  आम्ही लोकांना समजवू,  सत्ताधारी मंत्रींना सांगा, रोज केंद्राकडे बोट दाखवत असतील तर मग आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा कसे करता. सत्ताधारी मंत्र्यांना समज देण्याची गरज – फडणवीस

    सत्ता पक्षतील मंत्र्यांनीही राजकारण करू नये नाही तर त्यांच्ये इंटरव्ह्यू पाहिले तर आम्हाला त्याला उत्तर द्यावे लागते. मुख्यमंत्री आपण सत्ता पक्षतील मंत्र्यांना समज दिली पाहिजे

    मुख्यमंत्री साहेब जनभावनेचा विचार करा, आमची सर्व प्रकारे सहकार्य करण्याची तयारी आहे

  • 10 Apr 2021 05:35 PM (IST)

    Maharashtra Lockdown Update Devendra Fadnavis Live : पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल : फडणवीस

    व्यापाऱ्यांचे गेले वर्ष त्यांचे वाया गेले. कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत. हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असं देवेंद्र फडणवीस  म्हणाले.

    छोटा धंदेवाला आता पूर्णपणे संपला तर तो पुन्हा उभा राहणार नाही

    गेले वर्ष त्यांचे वाया गेले. कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत

    राज्य सरकारने थोडा डेफिसट वाढला तर त्याचा आता विचार करू नये.

    मंदिरतील फुलवाले, प्रसादवाले तसंच केशकर्तनालय यांच्या पुढे काही पर्यायच नाही

    विचारान कम्प्लिट lockdown केला तर लोकांतून उद्रेक होईल

    निर्बंध काही प्रमाणात असले पाहिजे जनतेचा उद्रेक ही लक्षात घेतला पाहिजे। काही तर मार्ग काढावा लागेल। छोटे उद्योग मध्ये नाराजी आहे। त्यांना काही तरी पर्याय द्यावा लागेल। त्यांना जी एस टी , वीज बिल भरावा लागतो , 2 सूत्र करावे काय काय चालू शकतो।ककमवा ज्यांना आपण बिलकुल चालू च देऊ शकत नाही त्यांना आपण काय दिलासा देऊ शकतो

    आपली अर्थव्यस्था मजबुती आहे । छोटा व्यवसायिक जर आता सम्पला तर तो पुन्हा उभा राहू शकणार नाही। राज्य सरकार ने आर्थिक बाबी चा विचार न करता काही ना काही मदत केली पाहिजे

  • 10 Apr 2021 05:28 PM (IST)

    Maharashtra lockdown update Devendra Fadnavis : निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा: फडणवीस

    रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील ही उपाययोजना हवी.  खाजगी स्तरावर रेमडेसीवर कुठेही नाही ही गंभीर बाब. रेमडेसीवर कसे उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

    निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

    रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील ही उपाययोजना हवी

    खाजगी स्तरावर रेमडेसीवर कुठेही नाही ही गंभीर बाब

    रेमडेसीवर कसे उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे

    व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील

    ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी लागेल

    इतर ठिकाणाहून कसं ऑक्सिजन मिळालं पाहिजे, इंडस्ट्रीचं ऑक्सिजन कमी करावा लागेल बेड्स मॅनेज करावे लागतील हा प्रादुर्भाव किती दिवस राहील हे सांगता येत नाही त्यामुळे व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील

    जनतेची – व्यापाऱ्यांची भावना लक्षात घ्यायला हवी

    गेले वर्ष त्यांचे वाया गेले. कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत

  • 10 Apr 2021 05:26 PM (IST)

    Maharashtra CM Uddhav Thackeray LIVE : एक मुखाने निर्णय घेण्याची गरज आहे : मुख्यमंत्री

    लोकांचे येणे जाणे कमी करणे हा विषय आहे. कार्यालयाच्या वेळा बदला. घरी काम करण्याची परवानगी द्या पण अजून ते झालेलं नाही : उद्धव ठाकरे

    व्हॅक्सिनचा दुसरा डोस देऊन पण लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधानसमोर मांडला होता- सी एम

    चेन तोडणे आरोग्य सुविधा वाढवणे

    कालच निर्णय झाला असता पण काल देवेंद्रजी आपण नव्हता म्हणून आजचीही बैठक बोलावली आहे

    निवडणूक आणि लग्न सराई सुरू झाली, 25 वर्षावरील मुलं सुद्धा संक्रमित होत आहे पंतप्रधान कडे विनंती केली आहे की 45 वयावरील तसेच आता 25 वर्ष अधिकला लसदेण्याची पण काल विनंती केली

    उद्योग – लोकांचं येणे जणे कमी करणे हा उद्देश्य आहे . कार्यालयाच्या वेळा बदला, घरातून काम करण्याची नियोजन करा , पीक आवर ही संकल्पना आता बदलायला हवा

    एक मुखाने निर्णय घेण्याची गरज आहे

    महिन्याभराच्या आता आपण नियंत्रण आणू शकतो. पण एकमत व्हायला हवं

  • 10 Apr 2021 05:17 PM (IST)

    Maharashtra lockdown update : लॉकडाऊनची वेळ आली आहे दुसरा कोणता पर्याय नाही – मुख्यमंत्री

    15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी, अध्याप 1200मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता, रेमडिसीव्हरचा तुटवडा आहे

    लॉक डाऊनची वेळ आली आहे दुसरा कोणता पर्याय नाही – मुख्यमंत्री

    आम्ही कुठे कमी पडतो आहे का ? असे केंद्र सरकारला विचारणा करीत आहोत

    लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    कळत नकळत प्रसार हा फार घातक : उद्धव ठाकरे

    तरुण वर्ग जास्त बाधित होत आहे हे आढळून येत आहे : उद्धव ठाकरे

    25 अधिक वय ही विनंती पंतप्रधानांना केली आहे : उद्धव ठाकरे

    आपल्याला रुग्ण वाढ थांबवायची आहे : उद्धव ठाकरे

  • 10 Apr 2021 05:12 PM (IST)

    Maharashtra lockdown update मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक सुरु

    मुख्य सचिव सीताराम कुंटे माहिती देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर चंद्रकांत दादा पाटील , अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित, वैद्यकीय संचालक तात्याराव लहाने उपस्थित, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , विजय वडेट्टीवार, नाना पटोले उपस्थित राजेश टोपे उपस्थित

  • 10 Apr 2021 04:47 PM (IST)

    राज्यासाठी एकच निर्णय घेणार – अजित पवार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नसेल, राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाईल असं अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळे राज्यासाठी कोणता निर्णय घेतला जाणार याकडे राज्याचं लक्ष आहे

  • 10 Apr 2021 04:29 PM (IST)

    28 दिवसांचा लॉकडाऊन करा, माजी खासदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

    महाराष्ट्रात 28 दिवसाचा लॉकडाऊन करा, असं पत्र माजी खासदाराने लिहिलं आहे. माजी खासदार आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड (Ex MLC Haribhau Rathod) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

  • 10 Apr 2021 04:27 PM (IST)

    MPSC परीक्षा पुढे ढकलली

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

  • 10 Apr 2021 04:26 PM (IST)

    विजय वडेट्टीवारांचे लॉकडाऊनचे संकेत

    “राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचं मत घेतलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Published On - Apr 10,2021 7:43 PM

Follow us
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.