एकच मंत्र, गर्दी करु नका, आपण या युद्धात जिंकणारच : मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील जनतेने एकच मंत्र लक्षात ठेवा. कुठेही गर्दी करु नका. आपण या युद्धात जिंकणार म्हणजे जिंकणारच असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Corona Virus) म्हणाले. 

एकच मंत्र, गर्दी करु नका, आपण या युद्धात जिंकणारच : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Mar 31, 2020 | 8:48 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 302 झाली (CM Uddhav Thackeray Corona Virus) आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही 153 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील जनतेने एकच मंत्र लक्षात ठेवा. कुठेही गर्दी करु नका. आपण या युद्धात जिंकणार म्हणजे जिंकणारच असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“कोरोनाचे हे युद्ध आता अटीतटीच्या वळणावर आलं (CM Uddhav Thackeray Corona Virus) आहे. हाच तो काळ आहे या काळात हा विषाणू गुणाकार करतो. कोरोना विषाणू आपली पकड मजबूत करायला बघतो आहे. पण आपणसुद्धा धैर्याने त्याला तोंड देत आहोत. या लढाईत आपला संयम आणि आपली जिद्ध ही आपली तटबंदी आहेत. या तटबंदीवर विषाणूंनी कितीही टकरा मारल्या तरी आपण लेचेपेचे नाही आहोत. कारण आणि संयमाची आणि जिद्दीची तटबंदी मजबूत आहे. टकरा मारुन तो नष्ट होईल,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“नायडू हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी बोललो. त्यांनी घातलेले किट पाहून गणवेशधारी सैनिक बसले आहेत असं वाटत होतं. आरोग्य कर्मचारी, एसटी, बीएसटी गाडी चालक, पोलीस या सर्व कर्मचाऱ्यांची कौतुक करायचे आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्रातल्या या कर्मचाऱ्यांचे कपात केलेलं नाही. हे अचानक उद्भवलेलं संकंट आहे. कोरोनाचं संकट गेल्यानंतर आर्थिक संकंट येण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगाला त्याला तोंड द्यावं लागणार आहे. आर्थिक घडी मोडू नये याची खबरदारी घेत आहोत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“कोणाच्याही वेतनात कपात केलेली नाही. फक्त काही टप्प्यात विभागणी केलेली आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेत कपात केलेलं नाही. कुणाचंही वेतन कपात केलेली नाही. थोडीशी घडी नीट बसवण्यासाठी आपण मांडणी करत आहोत. सर्वांनी सहकार्य करावं,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“मुंबईत काही ठिकाणी सील केलं गेलं आहे. हे करावं लागतं आहे. कारण रु्ग्णांच्या अलीकडचे आणि पलीकडचे संपर्क आपण शोधतोय. त्यांच्यापासून इतरांना कुणाला संसर्ग होऊ नये त्याची काळजी आपण घेत आहोत,” असेही ते म्हणाले.

“मधल्या काळात जे प्रवासी किंवा पर्यटक आले असतील केंद्र सरकारच्या यादीत नावे नसलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशींनी पुढे या आणि आपली माहिती द्या आणि तपासणी करुन घ्या. आपल्यापासून इतरांना धोका निर्माण करु नका,” असेही आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

“सध्याच्या वातावरणात ताप आणि खोकला येणं नैसर्गिक आहे. घाबरुन जाऊ नका. गरम होतं म्हणून एसी लावू नका. त्याऐवजी खिडक्या उघड्या ठेवा. साधारण वातावरणात हा विषाणू फाळ काळ वाचत नाही. तसेच थंड पाणी, थंड पेय, थंड सरबत टाळा आणि त्याऐवजी कोमट पाणी प्या. त्याने कोरोनावर उपचार होईल असं नाही. मात्र, सर्वसाधारण सर्दी आणि खोकला बरा होईल,” असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट (CM Uddhav Thackeray Corona Virus) केले.

“टीव्हीवर ज्या बातम्या येत आहेत. अनेक मजूर स्थलांतर करत आहेत. मात्र, स्थलांतर करु नका. आता त्यांना जात येणार नाही. जिल्हा आणि राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. सर्व मजुरांच्या काळजी साठी 1000 ठिकाणी जेवणाची केंद्र सुरु केली आहे. जवळपास लाखापेक्षाही जास्त मजूर आहेत. प्रत्येक राज्यात मजुरांची काळजी घेतली जात आहे,” असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले.

“रेशनबद्दल केंद्र सरकारकडून सूचना आले आहेत. राज्य सरकारकडूनही वाटप होणार नाही. जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ देणार नाही. तेवढा साठा आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“शिवभोजन थाळी आता पाच रुपयात केली आहे. शिवभोजन थाळ्यांची संख्या 25 हजारांपर्यंत गेली आहे. मी 1 लाखांपर्यंत परवानगी दिली आहे. त्याही पलीकडे जायचं झालं तर तेही करु. पण अनावश्यक गर्दी करु नये. शिवभोजन केंद्रातही अनावश्यक गर्दी करु नये. हळूहळू शिस्त येत आहे. मात्र, ती शिस्त पूर्णपणे आली पाहिजे. भाजी मार्केटमध्ये अंतर ठेऊन उभं राहावं. सगळं व्यवस्थित होत आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“बरे होऊन घरी जाणारेसुद्धा आहेत. लक्षणे लपवू नका. या युद्धात आपण जिंकणारच,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“शिवभोजन थाळी आता पाच रुपयात केली आहे. शिवभोजन थाळ्यांची संख्या 25 हजारांपर्यंत गेली आहे. मी 1 लाखांपर्यंत परवानगी दिली आहे. त्याही पलीकडे जायचं झालं तर तेही करु. पण अनावश्यक गर्दी करु नये. शिवभोजन केंद्रातही अनावश्यक गर्दी करु नये,” असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.