पत्र्यांऐवजी घरांवर सिमेंट स्लॅब, वीज पडून नुकसान टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर, कोकण उभं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्लॅन

नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले आणि ती उडून गेली. परंतु कौलारु घरे शाबूत राहिली.

पत्र्यांऐवजी घरांवर सिमेंट स्लॅब, वीज पडून नुकसान टाळण्यासाठी  लाइटनिंग अरेस्टर, कोकण उभं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्लॅन
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 7:34 PM

मुंबई : जागतिक बँकेच्या सहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ (CM To Rebuild Kokan) धोके निवारण प्रकल्प (NCRMP) या अंतर्गत 397.97 कोटीची कामे किनारपट्टीवरील जिल्ह्यामध्ये सुरु आहेत. ती युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा आपत्तीला सामोरे जाण्यासाठी ही कामे त्वरित सुरु करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय, चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरांवर पत्र्यांऐवजी सिमेंट स्लॅब टाकण्यात येणार आहे. तसेच, वीज पडून नुकसान टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर बसवण्यात येणार आहे. कोकणला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवा प्लॅन तयार (CM To Rebuild Kokan) केला आहे.

जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या नॅशनल सायक्लोन रिस्क मिटीगेशन प्रोजेक्ट, राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाची आढावा बैठक आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी या प्रोजेक्टच्या अंतर्गत समुद्र किनारीच्या जिल्ह्यांच्या भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे, यावर भर दिला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, पालघर जिल्ह्यातील सातपाडी येथील 203.77 कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. सर्व नियोजित भूमिगत विद्युत वाहिनी कराराला वेळेत पुरस्कार देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामुळे अतिरिक्त भूमिगत विद्युतवाहिन्यांची कामे करण्याकरिता 390 कोटी रुपयांना तत्वता मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मालवण 90 कोटी, अलिबाग 25 कोटी, रत्नागिरी 200 कोटी आणि सातपाडी साठी 35 कोटी रुपये विद्यमान कामांना वाढविण्यास तत्वता मान्यता दिली आहे.

या प्रोजेक्ट अंतर्गतच खार प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठीही 55.22 कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील नारवेल बेनवले साठी 44.40 कोटी, कचली पिटकरी 10.82 कोटी देण्यात आले आहेत.

आपत्तीपूर्व प्रणाली साठी (EWDS) 53 कोटी रुपये देण्यात आले असून या प्रोजेक्ट अंतर्गत आपत्तीपूर्व प्रणालीची निविदा प्रकाशित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

11 ठिकाणी निवारे उभारणार

किनारपट्टीच्या भागात 11 निवारे सध्या उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली. याशिवाय 30 निवारे आवश्यक असून त्यासाठीही तरतूद उपलब्ध करुन घेण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.

घरांवर सिमेंटचा स्लॅब 

नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले आणि ती उडून गेली. परंतु कौलारु घरे शाबूत राहिली. आता जी घरे पूर्ववत उभी करायची आहे त्यावर पक्का सिमेंटचा स्लॅब टाकण्यात येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली (CM To Rebuild Kokan).

वीज पडून नुकसान टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर बसवणार 

वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी वारंवार वीज पडण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये लाइटनिंग अरेस्टर बसविण्याबाबत लवकरात लवकर कारवाई व्हावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

कोकण किनारपट्टीला नेहमी चक्रीवादळांचा धोका असतो. कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांसाठी चक्रीवादळापासून संरक्षणासाठी जे जे प्रकल्प आणता येतील ते आणले जातील. जागतिक बँकेच्या सहाय्याने सध्या सुरु असलेले विविध प्रोजेक्ट त्वरित पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

CM To Rebuild Kokan

संबंधित बातम्या :

मुंबईत कोरोनाबाधितांना बेड्स उपलब्ध करण्यासाठी ‘वॉर्डनिहाय वॉर रुम’, वैशिष्ट्यं काय?

लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचे सरकारकडे कसलेच नियोजन नाही, मनसेची टीका

मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.