AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसची पहिली मोठी घोषणा, कोल्हापूरची निवडणूक स्वतंत्र लढणार

राज्यातील पाच महानगरपालिकांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे.

काँग्रेसची पहिली मोठी घोषणा, कोल्हापूरची निवडणूक स्वतंत्र लढणार
| Updated on: Dec 26, 2020 | 1:50 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक (Kolhapur Municipal election) महाविकास आघाडीतील (Maha vikas aaghadi) सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याचं म्हटलंय. मात्र निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. (Congress announcement about Kolhapur municipal election)

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी गर्दी होत आहे. आज सकाळीच त्यांच्या बावडा येथील निवासस्थानी अनेकांनी भेट घेऊन इच्छुक असल्याचे सांगितले आहे. यावेळी सतेज पाटील यांनी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार आहोत, मात्र निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे जाहीर केले.

सतेज पाटील नेमकं काय म्हणाले?

कोल्हापूर महापालिका प्रस्ताविक आहे. मागील वर्षी महानगरपालिका निवडणुकीत विविध पक्षांमध्ये चुरस होती. स्वतंत्र निवडणूक लढणार असं शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जाहीर केलं आहे. काँग्रेसही स्वतंत्र निवडणूक लढवेल, आम्ही आमचा निर्णय वरिष्ठांना कळवणार आहे. महाविकास आघाडी नक्की महापालिकेवर सत्ता स्थापन करेल, असं सतेज पाटील म्हणाले.

महापालिका निवडणूक काँग्रेसकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार उत्सुक आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार आहेत. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सर्व एकत्र येऊ, असं सतेज पाटील यांनी नमूद केलं.

कोल्हापुरातील सध्याचं काय चित्र?

कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीचीच सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महापालिकेत एकत्र आले होते.

औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा? 

तिन्ही पक्ष आता आगामी निवडणूक एकत्र लढतात की स्वतंत्र हे येत्या काळात स्पष्ट होईल. जागा वाटपातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा फॉर्म्युला वापरण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर मात्र पुन्हा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते. विशेष म्हणजे, काही प्रभागात छुपी युती करत भाजप आणि ताराराणी आघाडीला आव्हान देण्याचीही शक्यता आहे

कोल्हापूर महापालिका निवडणूक पक्षीय बलाबल (Kolhapur Municipal corporation election 2021)

  • काँग्रेस- 30
  • राष्ट्रवादी- 15
  • शिवसेना- 04
  • ताराराणी आघाडी- 19
  • भाजप- 13
  • एकूण जागा – 81

5 महापालिकांसाठी निवडणूक

कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच बड्या महानगरपालिकांची (Mahanagar Palika Election) निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. (Local bodies and Mahanagar Palika election 2021 in Maharashtra)

सूत्रांच्या माहितीनुसार, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय, राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या आसपास निवडणुका पार पडतील. त्यामुळे राज्यात फेब्रुवारी महिन्यात राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळू शकते.

कोणत्या महापालिकेत किती जागांसाठी मतदान?

नवी मुंबई – 111

औरंगाबाद – 113

वसई-विरार – 115

कल्याण डोंबिवली 122

कोल्हापूर 81

(Congress announcement about Kolhapur municipal election)

संबंधित बातम्या 

कोल्हापूर महापालिका निवडणूक चंद्रकांत पाटलांचं भवितव्य ठरवणार?

औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा? 

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.