AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस कार्यकर्ते सुस्तावले, पेटून का उठत नाही?; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दाखवला आरसा

विधानसभा निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतरही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात वाद होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी तुटते की राहाते असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने आपल्याच कार्यकर्त्यांना शालजोडे दिले आहेत.

काँग्रेस कार्यकर्ते सुस्तावले, पेटून का उठत नाही?; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दाखवला आरसा
| Updated on: Jan 26, 2025 | 3:23 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा निकालात महाविकास आघाडीला मोठे अपयश आले आहे. महाविकास आघाडीचा खेळ 50 जागातच आटपला. महाविकास आघाडीत शिवसेना ( उबाठा ) पक्षाला 20 जागा, काँग्रेसला 16 जागा तर शरद पवार राष्ट्रवादी गटाला 10 जागा मिळाल्या आहेत. या दारुण पराभवानंतर काँग्रेस आत्मचिंतन करायला तयार नाही असं वातावरण आहे. आता या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ट नेते माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस आपल्या पराभवातून कोणताही धडा शिकत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यावर माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी यावेळी सांगितले की काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना सुनावलेल्या खड्या बोलाची आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आजही आपण सत्तेत असल्याचे वाटते आहे. काँग्रेस कार्यकर्ते सुस्तावले आहेत. निवडणुकीतील पराभवानंतरही ते पेटून का उठत नाहीत? असा सवाल प्रा. वसंत पुरके यांनी केला आहे. ते अकोला येथे आले असता पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. तर काँग्रेसने आज राज्यभरात निवडणूक आयोगाचा दुटप्पीपणा आणि राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा-जिल्ह्यात मोठ्या नेत्यांच्या पत्रकार परिषद आयोजित केल्या होत्या.‌ त्यासाठी ते अकोल्यात आले होते.

संपूर्ण विदर्भात दौरा करणार – वसंत पुरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान झाल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्ते म्हणावे तसे पेटून उठले नसल्याची खंत  प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी भाजपची देखील स्तुती केली आहे. ते सतत 60 वर्षे हरल्यानंतरही निराश झाले नाहीत. दोन खासदारांपासून सुरुवात करून ते आता सत्तेत पोहोचल्याचा दाखलाही त्यांनी दिला आहे. मग काँग्रेस एक-दोन निवडणुका हरल्यानंतर निराशेच्या गर्तेत का गेलीय ? असा‌ सवाल‌ केला आहे. आपण काँग्रेस कार्यकर्त्यांमधील निराशा झटकण्यासाठी लवकरच संपूर्ण विदर्भात दौरा करणार असल्याचे प्रा. वसंत पुरके यांनी म्हटले आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.