महाविकास आघाडीचा लोकसभा फॉर्म्युला कधी ठरणार, ‘या’ नेत्याने दिला महत्वाची माहिती

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून कुठलाही वाद नाही. महाविकास आघाडीचे 40 खासदार कसे निवडून येतील हा प्रयत्न आम्ही करत आहोत. तीनही पक्ष लोकसभेची तयारी करत आहेत

महाविकास आघाडीचा लोकसभा फॉर्म्युला कधी ठरणार, 'या' नेत्याने दिला महत्वाची माहिती
LEADERS OH MAHAVIKAS AGHADI
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 4:24 PM

दिनकर थोरात, कोल्हापूर : 19 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 25 ऑगस्टला कोल्हापुरात सभा घेणार आहेत. या सभेची राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. शरद पवार यांच्यावर कोल्हापुराकरांचे नेहमीच प्रेम राहिले आहे. 25 ऑगस्टला ते कोल्हापुरात आल्यावर आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांचे उत्साहात स्वागत करणार आहे, असे राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

कोल्हापुरामधील पहिल्या इनडोअर स्टेडियमला स्थगिती आणण्याचे पाप खासदार धनंजय महाडिक यांनी केले असा आरोप पाटील यांनी केला. जिल्ह्यात 10 कोटीचे इनडोअर स्टेडियम मंजूर झाले होते. पण, त्याला खासदार महाडिक यांनी हायकोर्टाटून स्थगिती आणली. आमच्या काळात जे निर्णय घेतले त्यातील अनेक विकासाकामांना स्थगिती दिली गेली. त्यांनी ते काम बाहेर नेलं. हे पाप त्यांचं आहे. खेळाडूंवर त्यांनी अन्याय केला, अशी टिका त्यांनी केली. राज्यसरकारने आणखी 10 कोटी स्टेडियमला द्यावे. पण, हे स्टेडीयम रद्द करू नये अशी मागणीही त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

बागलकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला. ही घटना निषेधार्ह आहे. भाजपची नगरपरिषदेमध्ये सत्ता आहे. भाजप एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असले तरी चार बोटे तुमच्याकडे आहेत हे लक्षात ठेवा. शासन किती गतिमान आहे याची ही प्रचिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यात काय कधी होईल…

जे आता सरकारमध्ये आहेत तेच पूर्वी महाविकास आघाडीवर टीका करत होते. मात्र आता, त्यांचं तीन पक्षाचं सरकार आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर होत आहे. राज्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही दुर्दैवाने असे वातावरण तयार झालं आहे. याचा परिणाम प्रशासनावर होणार आहे. लोकांची कामे होतं नाहीत. तसेच, राज्यात सत्ता नेमकी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता कोण जेवायला जातं कोण जातं नाही याचा डायरेक्ट परिणाम विकासावर होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

कुठलाही वाद नाही…

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून कुठलाही वाद नाही. महाविकास आघाडीचे 40 खासदार कसे निवडून येतील हा प्रयत्न आम्ही करत आहोत. तीनही पक्ष लोकसभेची तयारी करत आहेत. मात्र, उमेदवारीबाबत मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल. कोल्हापुरमध्ये पुरोगामी विचारांचा उमेदवार निवडून यावा अशी आमची इच्छा असून तिन्ही पक्ष एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिन्ही पक्ष संपूर्ण 48 जागांची चाचपणी करणार असल्याचीही माहिती सतेज पाटील यांनी दिली.

छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांची इच्छा महत्वाची

छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. काय इच्छा आहे ते पाहिले पाहिजे अशी प्रतिक्रिया लोकसभा निवडणूकीवरून दिली. मात्र, त्यांची इच्छा काय आहे हे महत्वाचे आहे. पुरोगामी विचाराचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशी आमची इच्छा आहे असे ते म्हणाले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.