मोदींचं मजुरांबाबतचं वक्तव्य म्हणजे हृदयशून्यतेचे उदाहरण, काँग्रेस नेते म्हणतात मोदी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने लॉकडाऊनमध्ये मजुरांना तिकीट काढून ट्रेनमध्ये बसवले आणि घरी पाठवल्याने कोरोनाचा प्रसार केला, असा आरोप केला आहे, त्यावर बोलताना असा आरोप हा मोदी सरकारच्या असंवेदनशीलता आणि हृदयशून्यतेचे उदाहरण आहे. मोदी सरकारच्या या निगरगट्ट पणाचा जाहीर निषेध आहे, अशा शब्दात सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदी (Pm Modi Speech) यांनी संसदेत बोलताना काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रहार केला. त्यानंतर आता राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासकरून मोदींच्या भाषणातल्या परप्रांतीय मजुरांना पाठवण्याच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्यांनी सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य म्हणजे दुर्दैवी आहे. त्यांच्या पदाला शोभणार नाही, ज्यावेळेस करूनचे संकट होते, त्यावेळेला लाखोच्या संख्येने परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात होते. (Lockdown) आम्ही महाविकास आघाडी असो अथवा काँग्रेसच्या वतीने असो आम्ही या सर्वांची महाराष्ट्रात काळजी घेतली. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली . त्यांचे तिकीट काढून दिली त्यांची काळजी घेतली ही वस्तुस्थिती आहे. याचं कौतुक पंतप्रधानांनी केलं असतं तर आम्हालाही बर वाटलं असतं असा टोला महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
मोदींचं वक्तव्य हृदयशून्यतेचे उदाहरण-सचिन सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने लॉकडाऊनमध्ये मजुरांना तिकीट काढून ट्रेनमध्ये बसवले आणि घरी पाठवल्याने कोरोनाचा प्रसार केला, असा आरोप केला आहे, त्यावर बोलताना असा आरोप हा मोदी सरकारच्या असंवेदनशीलता आणि हृदयशून्यतेचे उदाहरण आहे. मोदी सरकारच्या या निगरगट्ट पणाचा जाहीर निषेध आहे, अशा शब्दात सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर पंतप्रधान मोदी स्वत:चं अपयश झाकण्याकरता कॉग्रेसवर खापर फोडत आहे, असे नाना पटोले म्हणाले आहेत. कॉग्रेसनं माणूसकीचं नातं जपलं, लोकांकडे पैसे नव्हते. उलट कॉग्रेसनं मदत केली म्हणून शाबासकी दिली पाहिजे. रेल्वेचा कंट्रोल तर तुमच्याकडेच होता. रेल्वे तुम्हीच सुरु केलीत. कोरोना नियंत्रणात करता आला नाही हे पाप झाकण्याकरता हे आरोप केले जाता आहे, असी टीकाही त्यांनी केली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक जास्त आहेत. असंवेदनशिलतेची हद्द मोदींनी पार केलीय. असेही पटोले म्हणाले आहेत.
हार समोर दिसत असल्यामुळे हे डावपेच
लॉकडाऊन सुरु केलं तेव्हा रेल्वे, बस बंद केल्या होत्या. भारत-पाकिस्तानचं विभाजन झालं तेव्हा जे लोकांचे हाल झाले तेच हाल लॉकडाऊन मध्ये झाले. महिनाभर लोकांकडे रोजगार नव्हता, पैसे नव्हते. त्यावेळी माणूसकीचं जे नातं जोपासायला हवं होतं ते कॉग्रेसनं निभावलं. काँग्रेसने कोणत्याही मजुरांचा रोजगार हिरावून घेतला नाही तर त्या सर्वांची काळजी कोरोनाकाळात घेतली आहे. देशात कोरोना मृत्युचं तांडव जे पहायला मिळालं ते मोदींच्या चुकीच्या नियोजनामुळे पहायला मिळालं, असा आरोपही पटोलेंनी केला आहे. भाजप उत्तर प्रदेशमध्ये 5 राज्यांच्या निवडणुकीत पराभूत होतंय. त्यामुळे अश्या प्रकारचे आरोप लावले जात आहेत. नरेंद्र मोदींचे राजकीय डावपेच हे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाहायला मिळतात. मात्र जनतेला आता सगळं कळून चुकलेले आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या टिकेला अशोक चव्हाण यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. मोदींच्या भाषणावरून काँग्रेस नेते चांगलेच भडकून उटले आहे. मोदींचे हे आरोप दुर्भाग्यपूर्ण असल्याचे चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाण यांचं ट्विट
कोरोना को लेकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा संसद में कांग्रेस के खिलाफ लगाए गए आरोप दुर्भाग्यपूर्ण, अशोभनीय और सरासर गलत हैं। अगर केंद्र सरकार कांग्रेस पर कोरोना फैलाने का आरोप लगा रही है तो कोरोना भारत में कैसे आया? इसके लिए कौन जिम्मेदार है? इसका भी उन्हें जवाब देना चाहिए। pic.twitter.com/wLS9xekzcO
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 7, 2022