Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | ओबीसी आरक्षणावर भाजपचं पुतणा मावशीचं प्रेम, आरक्षण संपवणे हाच त्यांचा अजेंडा, नाना पटोलेंचा पलटवार!

ओबीसी आरक्षणप्रश्नी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशातील आरक्षण संपवणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे आणि तो काही लपून राहिलेला नाही.

Nana Patole |  ओबीसी आरक्षणावर भाजपचं पुतणा मावशीचं प्रेम, आरक्षण संपवणे हाच त्यांचा अजेंडा, नाना पटोलेंचा पलटवार!
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 3:12 PM

मुंबईः ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर (OBC political reservation) भारतीय जनता पक्षाला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हेच जबाबदार आहेत. भाजपाचा (BJP) डीएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे आणि आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपा दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा प्रहार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्र ओबीसी मोर्चात आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी आरक्षण रद्द होण्यावरून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींच्या आरक्षणाची कत्तल झालीय, असा घणाघात त्यांनी केला. तसेच ओबीसी आरक्षणाविरोधात पहिल्यांदा काँग्रेसनेच कोर्टात याचिका दाखल केली, असेही फडणवीस यांनी सांगितले.

‘आरक्षण संपवणे हाच RSSचा अजेंडा’

ओबीसी आरक्षणप्रश्नी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, देशातील आरक्षण संपवणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे आणि तो काही लपून राहिलेला नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आज जो पेच निर्माण झाला आहे त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनीच केली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार असताना 2017 साली नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लिअर करायचे म्हणून एक साधे परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. 2018 साली उच्च न्यायालयाने सांगितले होते की आयोग बसवा परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले. महाविकास आघाडी सरकार यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु त्यासाठी आवश्यक असणारा ओबीसींचा डेटा देण्यास केंद्रातील मोदी सरकारनेही नकार देऊन महाराष्ट्र सरकारची कोंडी केली. मध्यप्रदेश मध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मात्र केंद्रातील मोदी सरकराने त्या सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपाविरोधी सरकार असल्याने केंद्राने मदत केली नाही.

चुकीची आकडेवारी केंद्र का वापरतेय?

ओबीसी आरक्षणासंदर्भातील केंद्र सरकारकडची आकडेवारी चुकीची असेल तर इतर योजनांसाठी ही आकडेवारी का वापरली जातेय, असा सवाल नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्ष ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहेत. दोन वर्षे काय केले असा प्रश्न विचारत आहेत. मग फडणवीस सरकारने पाच वर्षे काय केले? त्यांनी आयोग गठीत का केला नाही? इम्पिरिकल डेटामध्ये असंख्य चुका आहेत असा दावा करणाऱ्या फडणवीसांनी मोदी सरकारक़डे हा डेटा कशासाठी मागितला होता? आणि त्याच डेटाचा वापर मोदी सरकार सरकारी योजना राबवण्यासाठी का करत आहे? हे प्रश्न उपस्थित होतातच. मंडल आयोग लागू केल्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाला 27 टक्के आरक्षण लागू झाले. ह्या निर्णयाला देशभर भारतीय जनता पक्षानेच तीव्र विरोध केला होता हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह जे भाजपा नेते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला दोष देत आहेत त्यांनी आधी आपला इतिहास तपासून पहावा. ओबीसींच्या आरक्षणाचा मारेकरी भारतीय जनता पक्षच आहे, त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडून भाजपा आपल्या पापातून मुक्त होऊ शकत नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?.
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.