युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांबाबत केंद्राशी समन्वय साधा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
मुंबई: रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine) क्षेपणास्त्रांचा (Missile) मार केल्यानंतर तेथील परिस्थितीत भयानक झाली आहे. युक्रेनमधील अनेक नागरिकांनी आता स्थलांतराचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे युक्रेनमधील नागरिक आणि स्थलांतर होऊन आलेले नागरिकही सुरक्षित ठिकाणी पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्यासाठी तसेच त्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी […]

मुंबई: रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine) क्षेपणास्त्रांचा (Missile) मार केल्यानंतर तेथील परिस्थितीत भयानक झाली आहे. युक्रेनमधील अनेक नागरिकांनी आता स्थलांतराचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे युक्रेनमधील नागरिक आणि स्थलांतर होऊन आलेले नागरिकही सुरक्षित ठिकाणी पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्यासाठी तसेच त्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने योग्य पद्धतीने समन्वय साधावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या मुख्य सचिवांबरोबर संपर्क साधण्यासाठी त्यांनी सूचना केल्या आहेत.
विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी व त्यांची तेथील नेमकी त्यांची काय परिस्थिती आहे याबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला सांगितले. कारण सध्या युक्रेनमधील परिस्थिती भयंकर आहे. त्यामुळे आपल्या देशातील नागरिकांची काळजी करण्यासारखीच परिस्थिती असल्याने उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाशी संपर्क साधून मुख्य सचिवांबरोबर याबाबत चर्चा केली.
In light of the current situation in Ukraine, CM Uddhav Balasaheb Thackeray has directed the administration to swiftly work in tandem with the Ministry of External Affairs to ensure the safe return of our citizens, especially students from Maharashtra.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 24, 2022
नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांना चिंता
महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्य सचिवांनी केंद्र शासनाशी समन्वय साधून नागरिकांबरोबर सातत्याने संपर्कात राहावे असेही सांगण्यात आले आहे.
सध्या युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती असल्याने महाराष्ट्रातील नागरिकांची काळजी घेण्याच गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत केंद्राने परराष्ट्र खात्याबरोबर संपर्क साधून नागरिकांना देशात घेऊन येण्यासाठी समन्वय साधावा असेही त्यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या
Russia-Ukraine war: ‘या’ मुद्यावरुन तुम्हाला कळेल रशिया आणि युक्रेनमध्ये का युद्ध सुरु आहे ते?
Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!