कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना भव्य लग्न, 700 लोकं सामील, सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार, अधिकारी झोपलेत का?

महापालिका अधिकारी दंडात्मक कारवाई का करीत नाही? हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय (Corona Cases increase but peoples not follow rules in Kalyan Dombivli).

कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना भव्य लग्न, 700 लोकं सामील, सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार, अधिकारी झोपलेत का?
लग्न की कोरोनाची जत्रा, आयोजकांवर गुन्हा, पण दंडात्मक कारवाई का नाही? प्रशासनावर प्रश्नचिन्ह
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 2:30 PM

कल्याण (ठाणे) : केडीएमसीत काल (10 मार्च) एकाच दिवसात कोरोनाचे जवळपास चारशे नवे रुग्ण आढळून आले. याच दिवशी कल्याणमध्ये एक मोठा लग्न सभारंभ पार पडला. या लग्न समारंभात तब्बल 700 पेक्षा जास्त लोक जमले होते. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, महापालिका अधिकारी दंडात्मक कारवाई का करीत नाही? हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय (Corona Cases increase but peoples not follow rules in Kalyan Dombivli).

नागरिकांची नियम पाळण्याची मनस्थितीच नाही?

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी (10 मार्च) तर दुप्पट रुग्णसंख्या वाढली. एका दिवसात 392 रुग्ण आढळून आले. गेल्या सहा महिन्यातील हा सर्वात मोठा आकडा आहे. म्हणजेच कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोरोनाचे प्रादूर्भाव दूर रोखण्यासाठी निर्बंध घातले आहेत. नागरिकांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तरीदेखील नागरिकांची काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही (Corona Cases increase but peoples not follow rules in Kalyan Dombivli).

अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष

विशेष म्हणजे आता अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. कल्याण पूर्वेत काल एक लग्न सभारंभ पार पडला. या लग्न सभारंभात 700 पेक्षा जास्त लोक सामील झाले होते. काही समाजिक कार्यकर्त्यांकडून याची तक्रार केल्यानंतर महापालिकेचे पथक त्याठिकाणी पोहचले. केडीएमसीचे अधिकारी दिपक शेलार यांच्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी लग्न सभारंभाचे आयोजक राजेश यशवंत म्हात्रे, महेश राऊत या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

दंडात्मक कारवाई नाही

मात्र, या लग्न सभारंभावर दंडात्मक कारवाई का नाही केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आम्ही प्रभाग अधिकरी वसंत भोंगाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एकीकडे नागरीकांनी निमय पाळावेत, असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे अधिकारी कारवाई करताना का निष्काळपणा करीत आहे? या विषयी संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता केडीएससी आयुक्त या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का? हा खरा सवाल आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये दिवसात दुप्पट रुग्णवाढ, महापालिकेकडून कडकडीत निर्बंध, नेमकं काय सुरु, काय बंद?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.